घरमुंबईतळोजा कारागृहाच्या ६ जेलरविरोधात तक्रार दाखल

तळोजा कारागृहाच्या ६ जेलरविरोधात तक्रार दाखल

Subscribe

कैद्याची बहिण वरिंद्रा कौर त्याला भेटण्यासाठी आली असता त्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी त्याच्या बहिणीने केलेल्या पाठपुराव्यानंतर जेलरविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.

खारघर पोलीस ठाण्यामध्ये तळोजा तुरुंगातील सहा जेलरविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नवीन वर्षात पैशांची पुर्तता न केल्याने तळोजा कारागृहातील २६ वर्षाच्या कैद्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. हत्येप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या जोरावरसिंह बलकारसिंह या कैद्याला मारहाण करण्यात आली होती. मुंबई हाय कोर्टाने तळोजा तुरुंगातील गैरव्यवस्थेबद्दल तीव्र आक्षेप नोंदविल्यानंतर जवळपास वर्षभरानंतर ही कारवाई करण्यात आली. ३ जानेवारी २०१८ ला कैद्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. कैद्याची बहिण वरिंद्रा कौर त्याला भेटण्यासाठी आली असता त्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी त्याच्या बहिणीने केलेल्या पाठपुराव्यानंतर जेलरविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.

गुरुवारी रात्री कारवाई 

आरोपी जेलर विरोधात खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रकाश पाईकराव, श्रीनिवास पातकाला, अमित गुरव, बापुराव मोटे, महेशकुमार माळी आणि अतुलकुमार काळे अशी तक्रार दाखल करण्यात आलेल्या जेलरची नावं आहेत. गुरुवारी रात्री त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. सर्व तुरुंगाधिकारी श्रेणी-२ या पदावर कार्यरत आहेत. या जेलरपैकी पाईकराव आणि पातकाल याच्याव्यतिरिक्त इतर जेलरला निलंबित करण्यात आले आहे.

- Advertisement -

बहिणीच्या पाठपुराव्याला यश 

कैदी जोरावरसिंह बलकारसिंह याची बहीण वीरेंद्र कौर हिने दिलेल्या तक्रारीनंतर मुंबई हायकोर्टाने तलोजा तरुंग महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यांच्या अहवालानंतर या सहा जेलरवर कारवाई करण्यात आली आहे. नवीन वर्षात पैसे न दिल्याबद्दल ३ जानेवारीला सकाळी तुरंग अधिकाऱ्याऱ्यांनी कैदीला हातावर, चेहरा आणि दोन्ही पायांवर बेदम मारहाण केली. बेदम मारहाणीमुळे तीनदा बेशुद्ध पडल्याचे त्याने बहिणीला सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -