घरताज्या घडामोडीभिवंडीत अग्नितांडव सुरूच; रुंगटा डाईंगला भीषण आग

भिवंडीत अग्नितांडव सुरूच; रुंगटा डाईंगला भीषण आग

Subscribe

भिवंडीतील रुंगटा डाईंगला भीषण आग लागली असून या आगीमध्ये अनेक मशीन जळून खाक झाल्या आहेत.

भिवंडीत आग लागण्याचे सत्र सुरूच असून शहरातील कल्याणरोड आसबीबी परिसरात असलेल्या रुंगटा डाईंग इमारतीला गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीची तीव्रता भीषण असल्याने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाची एक गाडी आणि ठाणे महापालिका अग्निशमन दलाची एक गाडी आग विझविण्यासाठी पाचारण करण्यात आली आहे. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, ही आग अद्याप विझलेली नसून आगीचे लोट पसरत आहेत.

मशीन जळून खाक

भिवंडी शहरातील आसबीबी रोडवर तीन मजल्याची रुंगटा डाईंग इमारत असून या डाइंगच्या तिसऱ्या मजल्याला भीषण आग लागली आहे. आगीने रोद्र रूप धारण केल्याने दूरपर्यंत आगीचे लोळ पसरले होते. या डाइंगच्या बाजूलाच नागरी वस्ती आणि यंत्रमाग कारखाने असल्यामुळे नागरिक आणि यंत्रमाग कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही . मात्र, या आगीत अनेक मशीन जळून खाक झाल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – धक्कादायक! महिलेला जिवंत जाळताना आली दुर्गंधी आणि…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -