नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली आहे. वाशी स्थानका येथील रघुलीला मॉलजवळ आज सायंकाळच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग कचऱ्याला लागल्याची माहिती समोर आली आहे. रघुलीला मॉलजवळील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आला होता. या कचऱ्यालाच अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग लागताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
याआधी देखील नवी मुंबईतील कोपरखैरणे आणि सीवूड स्थानकाजवळ आग लागल्याची घटना घडली होती. हे आगीचे सत्र सतत सुरु असतानाच आज पुन्हा एकदा वाशी स्थानक येथील रघुलीला मॉलजवळ असलेल्या कचऱ्याला आग लागल्याची घटना घडली आहे. या कऱ्यामध्ये गाडीचे टायर देखील असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही आग भडकण्याची शक्यता होती. मात्र वेळीच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
वाशीच्या रघुलीला मॉलजवळ आग,आगीचं कारण अद्याप अस्पष्ट #Vashi #MyMahanagar #Firebreakout pic.twitter.com/dY6RddflFf
— My Mahanagar (@mymahanagar) January 31, 2019