घरमुंबईकामगार रुग्णालयात पुन्हा आग

कामगार रुग्णालयात पुन्हा आग

Subscribe

अंधेरीतील कामगार रुग्णालायाच्या आगीची घटना ताजी असतानाच आज रुग्णालयाला पुन्हा आग लागली. विजेचा पुरवठा सुरु केल्यानंतर ही आग लागली आहे.

अंधेरीतल कामगार रुग्णालयाला आग लागून दोन दिवस झाले असतानाच पुन्हा आग लागण्याची घटना घडली. कामगार रुग्णालयाच्या मीटर रुमला आग लागली असून यामुळे येथील स्थानिकांमध्ये पुन्हा भिती निर्माण झाली आहे. मागील दोन दिवस या रुग्णालयाचा वीज पुरवठा बंद होता. आज संध्याकाळी तो सुरु करण्यात आला. वीज सुरु केल्यानंतरच येथील मीटर कक्षाला ही आग लागली असल्याचे समोर आले आहे. दरम्यान या घटनेत कोणतीही जीवितहाणी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. काही वेळेच्या प्रयत्नानंतर अखेर या आगेवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. मात्र काही तासांपूर्वीच आग लागलेल्या इमारतीला पुन्हा आग लागल्यामुळे प्रशासनाच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.

- Advertisement -

“रुग्णालयाला आग लागून काहीच तासच झाले आहेत. मात्र इतक्या लवकर विद्युत पुरवठा सुरु केल्यामुळे ही आग लागली आहे. आग लागल्यामुळे येथील कामगारांनी बाहेर मैदानाकडे धाव घेतली.” -मुरजी पटेल, स्थानिक नगरसेवक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -