घरताज्या घडामोडीपवईच्या म्हाडा कॉलनीत भीषण आग

पवईच्या म्हाडा कॉलनीत भीषण आग

Subscribe

आग लागताच इमारतीच्या रहिवाश्यांना ताबडतोब बाहेर काढण्यात आले.

पवईतील म्हाडा कॉलनीमध्ये आज संध्याकाळच्या सुमारास भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दलाच्या चार गाड्या त्वरित घटनास्थळी दाखल झाल्या. ही भीषण आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जावान युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनास्थळावरचे आगीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात आगीची भीषणता दिसून येत आहे.

पवईच्या हिरापन्ना मॉलसमोर म्हाडा कॉलनी आहे. म्हाडा कॉलनीच्या एमटीपीसी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील एका घरात ही आग लागली. संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आग लागताच इमारतीच्या रहिवाश्यांना ताबडतोब बाहेर काढण्यात आले. ही आग वाढत गेल्याने अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या आगीत कोणाला जीवितहानी झाली नासल्याची माहिती अग्निशमन दालाकडून देण्यात आली आहे. आग वाढल्यास दहा – बारा अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल कराव्या लागतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -