घरमुंबईMumbai Fire : मुंबईच्या बोरीवली परिसरातील रहिवासी इमारतीला आग; अग्निशमनच्या आठ गाड्या...

Mumbai Fire : मुंबईच्या बोरीवली परिसरातील रहिवासी इमारतीला आग; अग्निशमनच्या आठ गाड्या घटनास्थळावर दाखल

Subscribe

मुंबईच्या बोरिवलीतील चिकूवाडी परिसरात एका रहिवासी इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. दुपारी 12.40 वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या बाराव्या मजल्यावर ही आग लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

बोरिवली पश्चिमेकडील चिकूवाडी परिसरातील पॅरेडाइज् नावाच्या इमारतीच्या बाराव्या मजल्यावर ही आग लागली आहे. या आगीच्या घटनेवेळी इमारतीमध्ये अनेक रहिवासी अडकल्याची भीती व्यक्त केली जाते आहे. 24 मजल्याची ही इमारत आहे. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र इमारतीतील घराचे मोठे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -