घरताज्या घडामोडीFire Breaks: कांजूरमार्ग येथील नियोजित मेट्रो कारशेडच्या जागेवरील गवताला आग

Fire Breaks: कांजूरमार्ग येथील नियोजित मेट्रो कारशेडच्या जागेवरील गवताला आग

Subscribe

आगीत किमान १ हजार × १ हजार चौ. फूट जागेतील गवत जळून खाक झाले. आगीच्या घटनेवरून महाविकास आघाडी व भाजप यांच्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता.

मेट्रो कारशेडसाठी नियोजित केलेल्या व वादग्रस्त ठरलेल्या जागेत गवताला सोमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत किमान १ हजार × १ हजार चौ. फूट जागेतील गवत जळून खाक झाले. ही आग लागली की लावली, याबाबतची सत्य माहिती चौकशीतून समोर येणार आहे. मात्र या आगीच्या घटनेवरून महाविकास आघाडी व भाजप यांच्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईतील विविध मेट्रो रेल्वे मार्गावर लवकरच मेट्रो रेल्वे धावणाऱ आहे. या मेट्रो रेल्वे गाड्या पार्किंग करण्यासाठी भाजपप्रणित सरकारने त्यावेळी आरे कॉलनीतील जागा नक्की केली होती. मात्र सदर जागेतील झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होणार असल्याचा मुद्दा उपस्थित करीत शिवसेनेने आरेमधील जागेला विरोध केला होता. मात्र भाजपने त्यास दाद दिली नव्हती. मात्र नंतर विधानसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन झाले. शिवसेना व भाजप यांच्यात वितुष्ट निर्माण झाल्याने शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत घरोबा केला. तसेच, शिवसेनेने कांजूरमार्ग येथील भूखंडाला मेट्रो कारशेडसाठी वापरण्याचा निर्णय घेतला. त्या दृष्टीने सरकारने पावले उचलली. मात्र प्रकरण कोर्टात गेल्याने अधांतरी राहिले होते.

- Advertisement -

दरम्यान, सोमवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडच्या जागेतील गवताला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल, स्थानिक पोलीस व पालिका वार्ड कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ४ फायर इंजिन, वॉटर टँकर यांच्या साहाय्याने आगीवर सायंकाळी उशिराने नियंत्रण मिळविले. मात्र ही आग का व कशी काय लागली, याबाबत चौकशी सुरू असल्याचे समजते.

 

- Advertisement -

हेही वाचा – HSC SSC Exam : मुंबईतही विद्यार्थी ऑनलाइन परीक्षांसाठी आक्रमक ; गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -