घरताज्या घडामोडीCoronaVirus: कोरोनाशी लढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान ऑन ड्युटी २४ तास

CoronaVirus: कोरोनाशी लढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान ऑन ड्युटी २४ तास

Subscribe

कोरोनावर मात करण्यासाठी अग्निशमन दलाचे सर्जिकल स्ट्राईक सुरू केले आहे. ३५०० जवान ऑन ड्युटी २४ तास काम करत आहेत.

सदैव तत्पर असणारे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नशील असणारा दल म्हणजे ‘मुंबई अग्निशमन दल’. हे दल आगी विझवण्यासोबतच इमारती कोसळणे, वायू गळती, तेल गळती इत्यादी आपत्ती निवारण्याचे काम करते. मुंबई अग्निशमन दल हे भारतातील सर्वांत मोठे अग्निशामक दल आहे. सध्या कोरोना विषाणूने जगभरात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. मुंबईत सुद्धा याविषाणूचा फैलाव होत आहे. ज्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळ्यास त्या परिसराच्या हद्दीत अग्निशमन दलाचे जवान प्रवेश करून कोरोना विषाणूचा विरोधातील औषधांची फवारणी अर्थात एक प्रकारे कोरोना विरोधात सर्जिकल स्ट्राईक करताना दिसून येत आहे. आज अग्निशमन दलाचे ३ हजार ५०० जवान जीवाची पर्वा न करता ऑन ड्युटी २४ तास आपले कर्तव्य बजावत आहेत.

संपूर्ण विश्वात हाहाकार माजविणाऱ्या कोरोना विषाणूची दहशत मुंबईतही निर्माण झाली आहेत. देशाची आर्थिक राजधानी आता दिवसेंदिवस कोरोना विषाणूचे केंद्र बनत जात आहे. तब्बल राज्यात १ हजार ७८ कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले. तर एकट्या मुंबईत ६४२ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून २१ दिवसाचा लॉकडाऊन लागू केला आहे. कोरोना विषाणूविरोधात लढाईत वैद्यकीय सेवा बजावणारे डॉक्टरर्स ,परिचारिका, महापालिका, पोलीस, शासन आणि इतर कर्मचारी अत्यावश्यक सेवेकरिता कार्यरत आहेत. मात्र या कोरोना विषाणूला नष्ट करण्याचे काम मुंबईचे अग्निशमन दलाचे ३ हजार ५०० जवान अहोरात्र करत आहे. जिथे जिथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तात्काळ तो परिसर सील केला जातो. या भागात सॅनिटायझर फवारणी करण्याचे काम हे अग्निशमन दलाचे जवान करत आहे. सध्या या जागतिक संकटाला तोंड देण्यासाठी या अग्निशमन दलातील जवानांना ऑन ड्युटी २४ तास काम करत आहे.

- Advertisement -

ऑन ड्युटी २४ तास

विभागीय अग्निशमन दलाचे अधिकारी हरिश्चंद्र रघु शेट्टी यांनी दैनिक आपलं महानगरशी बोलताना सांगितले की, सध्या मुंबईत ३५ अग्निशमन दलाचे फायर स्टेशन तर १७ मिनी स्टेशन आहेत. या सर्व स्टेशनवर मिळून साधारणतः ३ हजार ५०० कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र यातील शेकडो जवान आणि अधिकारी मुंबईच्या बाहेरील ठाणे, कल्याण, विरार, डहाणू अशा विविध भागांतून येतात. त्यामुळे जाण्या-येण्यास खूप उशीर होतो. म्हणून त्यांना २४ तास ड्युटी करून दोन दिवसाची सुट्टी देण्यात येत आहे.

११ मिस्क ब्लोईंग मशीन

कोरोना प्रसार रोखण्यासाठी अनेक परिसर निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारी आहेत. त्यामुळे अग्निशमन दलाने तब्बल ११ मिस्क ब्लोईंग मशीन घेतल्या आहे. मुंबईच्या सहा रिझनच्या अग्निशमन दलाकडे या मशिनी देण्यात आले आहेत. या मशीनच्या माध्यमातून औषधाची फवारणी केली जात आहे. या मशीनची सोडियम हायपो क्लोराइडचा वापर केला जातो. त्यांची फवारणी संपूर्ण परिसरात केली जाते. त्यामुळे कोरोनाचे विषाणू नष्ट होतात.

- Advertisement -

क्यू.आर.व्हीचे १७ वाहन तैनात

कोरोनाच्या विषाणूला नष्ट करण्यासाठी आणि परिसराचे निर्जंतुकीकरण करण्याकरिता अग्निशमन दलाने १७ वाहने क्विक रिस्पांस व्हिकल (क्यूआरव्ही) आहेत. या क्यूआरव्ही वाहनांबरोबर एक पाण्याचे टँकर आणि एक फायर इंजिन पाठविण्यात येत आहे. सध्या ज्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून तिथे बाहेरील परिसर निर्जंतुकीरण करण्याची जबाबदारी अग्निशमन दलाकडे आहेत. तिथे हे वाहने रात्री जाऊन फवारणी करतात.

अग्निशमन दल हा कोणत्याही आपत्कालीन परिस्थतीशी लढण्यासाठी तत्पर आहेत. नेहमीच मुंबईतील जनतेने अग्निशमन दलाला सहकार्य केले आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा युद्धस्तरावर प्रयत्न करत आहे. त्याच प्रमाणे शासनाने दिलेल्या गाईड लाईनचे जनतेने पालन करावेत. तसेच अत्यावश्यक वस्तू खरेदी करायला बाहेर जात असताना मास्क उपयोग करावा. – हरिश्चंद्र रघु शेट्टी, विभागीय अग्निशमन अधिकारी, मुंबई विभाग


हेही वाचा – ‘आम्ही कामावर येतो, आधी वाहतुकीची व्यवस्था करा’, पालिका कर्मचाऱ्यांची मागणी!


 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -