घरमुंबई'या' मराठी मालिकेवरुन फायर ब्रिगेडच्या जवानांमध्ये हाणामारी

‘या’ मराठी मालिकेवरुन फायर ब्रिगेडच्या जवानांमध्ये हाणामारी

Subscribe

या गंभीर प्रकरणाची दखल घेत अंबरनाथ पोलीस मारहाण करणाऱ्यावर कारवाई करणार असल्याचं समजत आहे. 

झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका प्रेक्षकांची पसंतीची मालिका ठरली आहे. मात्र, याच मालिकेवरुन अंबरनाथमध्ये अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांमध्ये चक्क हाणामारी झाली. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका पाहण्यावरुन झालेल्या या वादामध्ये फायर ब्रिगेडचा एक कर्मचारी जखमी झाला. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्याविरोधात अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एखाद्या कलाकारावर असलेल्या प्रेमापोटी किंवा त्यांना भेटणासाठी, चाहत्यांनी केलेले अजब स्टंट्स तुम्हाला ठाऊक असतील. आजवर असे अनेक प्रसंग घडलेही आहेत. मात्र, एखाद्या मालिकेवरुन अशाप्रकारे राडा होण्याचा प्रकार नवलच म्हणावा लागेल.

नेमकं प्रकरण काय?

अंबरनाथ नगरपालिकेच्या विश्राम गृहामध्ये अग्निशामन दलाचे कर्मचारी प्रकाश कराड, हे रात्री साठेआठ वाजता ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका बघत होते. त्यावेळी प्रकाश यांचा सहकारी किशोर भोर तिथे आला आणि त्याने चॅमेल बदलत भारत-वेस्ट इंडिजची मॅच लावली. यामुळे प्रकाश यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी किशोरला पुन्हा मालिका लावण्यास सांगितलं. मात्र, किशोरने त्यांची मागणी धुडकावून लावली. यामुळे त्या दोघांमध्ये बाचाबाची देखील झाली, ज्याचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले. संतापलेल्या किशोरने प्रकाश कराड यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतकंच नाही तर त्यांना लोखंडी रॉडने मारहाणही केली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत अंबरनाथ पोलीस मारहाण करणाऱ्या प्रकाशवर योग्य ती कारवाई करणार असल्याचं समजत आहे.


धमाल व्हायरल Video – ‘आई मी आणि आळस’ 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -