घरताज्या घडामोडीकरीरोडच्या अविघ्न पार्कला भीषण आग, एकाचा मृत्यू

करीरोडच्या अविघ्न पार्कला भीषण आग, एकाचा मृत्यू

Subscribe

करीरोड स्टेशन जवळील असलेल्या वन अविघ्न पार्क इमारतीला भीषण आग लागली आहे. ही आग १९ व्या मजल्यावरील एका फ्लॅट मध्ये लागली असून इतर मजल्यावर पसरली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी महापौर किशोरी पेडणेकर देखील पोहोचल्या आहेत. या आगीत अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात असून इमारतीमधील कामगारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान यात एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

माहितीनुसार, आज सकाळी ११ वाजल्याच्या सुमारास करीरोड येथील वन अविघ्न पार्कला भीषण आग लागली. या आगीची माहितीच मिळताच अग्निशमन दलाच्या २० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अथक प्रयत्न केले जात आहेत. १९ व्या मजल्यावर ही आग लागली आहे. प्राथमिक माहितीनुसार, २५ व्या मजल्यापर्यंत ही आग पसरली आहे. या इमारतीमधील राहणाऱ्या लोकांना आणि कामगारांना सुखरुप बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

- Advertisement -

या अग्नितांडवात काही जण गंभीर जखमी झाल्याचे म्हटले जात आहे. या सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बहुमजली इमारतीला लागलेल्या आगीची तीव्रता वाढताना दिसत आहे. लेव्हल ३च्या आगीला लेव्हल ४चे स्वरुप आल्याचे म्हटले जात आहे.

 

- Advertisement -

करीरोडमधील बहुमजली इमारतीला आग | fire break out one avighna park at currey road

करीरोड स्टेशन जवळील असलेल्या वन अविघ्न पार्क इमारतीला भीषण आग लागली आहे. ही आग इतर मजल्यावर पसरली असून आगीचे लोट संपूर्ण परिसरात पसरले आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Friday, October 22, 2021

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -