घरमुंबईगिरगाव पुंगालिया हाऊस कंपाऊंडमध्ये भीषण आगीची घटना; 2 घर, 7 कार, 10 दुचाकी जळून खाक

गिरगाव पुंगालिया हाऊस कंपाऊंडमध्ये भीषण आगीची घटना; 2 घर, 7 कार, 10 दुचाकी जळून खाक

Subscribe

गिरगावमधील पुंगालिया हाऊस कंपाऊंडमध्ये काल ( 26 ऑक्टोबर) भीषण आगाची घटना घडली आहे. या आगीच्या घटनेत जवळपास 7 कार, आठ ते दहा दुचाकी जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. तर दोन घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. बुधवारी रात्री 11.30 ते 11. 45 च्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेत कंपाऊंडमधील लाखो रुपयांचे कपडे, प्लॅस्टिक आणि नायलॉनचे रोल आगीत जळून खाक झाले आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र एक स्थानिक शिवसेना कार्यकर्ता आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या गाड्या बाहेर काढताना भाजून किरकोळ जखमी झाला आहे.
या कार्यकर्त्याने स्थानिकांच्या मदतीने बऱ्याच गाड्यांना आगीपासून वाचवले आहे. फटाक्यानं ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल, रूग्णावाहिका, पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. अखेर दोन तासांच्या प्रयत्नांनंतर त्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या आगीत मोठ्याप्रमाणात आर्थिक हानी झाली आहे. दिवाळीच्या दिवसात फटाक्यांमुळे मुंबईसह अनेक राज्यांत भीषण आगीची घटना घडली. यावेळी मुंबईतही अनेक भागांत आगीच्या घटना घडत आर्थिक नुकसान झाले.


एसटीच्या ताफ्यात दाखल होणार 4000 नव्या गाड्या; बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -