घरताज्या घडामोडीसावधगिरी बाळगा! मुंबईमध्ये दिवाळीत फटाक्यांमुळे ३७ ठिकाणी आगीच्या घटना

सावधगिरी बाळगा! मुंबईमध्ये दिवाळीत फटाक्यांमुळे ३७ ठिकाणी आगीच्या घटना

Subscribe

मुंबईत दरवर्षी दिवाळीत फटाक्यांमुळे लहान - मोठ्या आगीच्या घटना घडत असतात. गतवर्षी दिवाळीत ४१ ठिकाणी फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या घटना घडल्या. तर यंदाच्या दिवाळीत आतापर्यंत ३७ ठिकाणी फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत.

मुंबई : मुंबईत दरवर्षी दिवाळीत फटाक्यांमुळे लहान – मोठ्या आगीच्या घटना घडत असतात. गतवर्षी दिवाळीत ४१ ठिकाणी फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या घटना घडल्या. तर यंदाच्या दिवाळीत आतापर्यंत ३७ ठिकाणी फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने या घटनांत कोणतीही मोठी जीवित हानी झाल्याचा प्रकार घडलेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत यंदाच्या दिवाळीत २२ ते २४ ऑक्टोबर या ३ दिवसात एकूण ८५ ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी ३७ ठिकाणी फटाक्यांमुळे आगी लागल्याच्या घटना घडल्या. कारण की, सोमवारी नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन होते. त्या दिवशी मोठ्या प्रमाणात फटाके वाजविण्यात आले. त्याचप्रमाणे या फटाक्यांच्या ठिणगीमुळेच काही ठिकाणी लहान – मोठ्या आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत.

- Advertisement -

२२ ऑक्टोबर रोजी १७ ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या. त्यापैकी २ आगी फटाक्यामुळे लागल्या. २३ ऑक्टोबर रोजी २७ ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या असून त्यापैकी ७ आगी फटाक्यामुळे लागल्या. तर २४ ऑक्टोबर रोजी ४१ ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या. त्यापैकी २८ ठिकाणी फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या घटना घडल्या. गेल्या तीन दिवसात ३७ ठिकाणी फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने या घटनांत कोणतीही जीवित हानी झाली नाही अथवा कोणीही जखमी झालेले नाही.

गेल्या वर्षी दिवाळीत १५९ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या होत्या. मात्र त्यापैकी ४१ ठिकाणी फटाक्यांमुळे आगी लागल्याच्या नोंदी आहेत. गेल्या वर्षी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ६५ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या होत्या. त्यापैकी ५० टक्के म्हणजेच ३३ ठिकाणी फटाक्यांमुळे आगी लागल्या होत्या.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबई गतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार; एकाला अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -