घरमुंबईटोलेजंग इमारतीत राहता? मग 'आगी'पासून राहा सावध

टोलेजंग इमारतीत राहता? मग ‘आगी’पासून राहा सावध

Subscribe

गेल्या १० वर्षात मुंबईतील तब्बल १ हजार ५६८ टोलेजंग इमारतींना आग लागल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय आग लागणाच्या दोन प्रमुख कारणांमध्ये शॉर्ट सर्किट आणि गॅस सिलेंडर लिकेज ही कारणं समोर आली आहेत.

स्वप्नांची नगरी असलेल्या मुंबईत एखाद्या टोलेजंग इमारतीत आपले हक्काचे घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, याच टोलेजंग इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलेला दिसतो आहे. गेल्या काही काळात मुंबईच्या गगनचुंबी इमारतींमध्ये सर्वाधिक आगी लागण्याच्या घटना समोर आल्या आहेत. गेल्या १० वर्षात तब्बल १ हजार ५६८ टोलेजंग इमारतींना आग लागल्याची माहिती समोर आली आहे.  आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई अग्निशमन दलाला दिलेल्या माहितीनुसार, सन २००८ पासून जुलै २०१८ पर्यंत एकूण ४८ हजार ४३४ ठिकाणी आग लागण्याच्या दुर्घटना झाल्या आहे. त्यापैकी गगनचुंबी इमारतींना लागलेल्या आगींची आकडेवारी १ हजार ५६८ इतकी आहे. इमारतींमध्ये लागलेल्या आगीची आकडेवारी थोडक्यात :

  • रहिवाशी इमारती – ८ हजार ७३७
  • व्यावसायिक इमारती – ३ हजार ८३३
  • झोपडपट्ट्यांमधील आग – ३ हजार १५१

‘या’ कारणांमुळे लागते आग

वृत्तानुसार, आग लागणाच्या काही महत्वाच्या कारणांमध्ये शॉर्ट सर्किट, गॅस सिलेंडर लिकेज ही दोन प्रमुख कारणं समोर आली आहेत. त्यापैकी आतापर्यंत ३२ हजार ५१६ वेळा शॉर्ट सर्किटमुळे आणि १ हजार ११६ वेळा गॅस सिलेंडर लिकेजमुळे आगी लागल्या आहेत. तर ११ हजार ८८९ वेळा अन्य कारणांमुळे आगी लागल्या आहेत. दरम्यान गेल्या १० वर्षांत या आगींमध्ये ६०९ लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय आगीच्या घटनांमध्ये एकूण ८९ कोटी ०४ लाख ८६ हजार १०२ रुपयांचे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

कोट्यावधींचे नुकसान

सर्वात जास्त गगनचुंबी इमारतीत परिमंडळ-III च्या हद्दीत एकूण ४९६ आगीच्या घटना घडल्या आहेत. तसंच सर्वात जास्त रहिवाशी इमारतीत परिमंडळ-IV च्या हद्दीत १ हजार ८३५ इतक्या आगीच्या घटना घडल्या आहेत. तसंच सर्वात जास्त व्यावसायिक इमारतीत परिमंडळ-I च्या हद्दीत ९८७ इतक्या आगीच्या घटना घडल्या आहेत. तसंच सर्वात जास्त झोपड्यात परिमंडळ-V च्या हद्दीत १ हजार २३७ इतक्या आगीच्या घटना घडल्या आहे. तर सर्वात जास्त एकूण १७७ लोकांचा बळी परिमंडळ-I च्या हद्दीत झाला आहे. सर्वात जास्त आगीच्या घटनेत नुकसान एकूण ३९ कोटी ४८ लाख ९ हजार ६८६ रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शकील अहमद शेख यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -