घरताज्या घडामोडीमुंबईमधील आगींच्या दुघर्टनांमध्ये यंदा वाढ झाली; बघा आकडेवारी

मुंबईमधील आगींच्या दुघर्टनांमध्ये यंदा वाढ झाली; बघा आकडेवारी

Subscribe

मुंबईत मागील काही वर्षांपासून आगींच्या घटना वाढत जात असून सन २०१७ मागील तीन वर्षांमध्ये आगींसह इतर दुघर्टनांंची आकडेवारी ४७ हजार ४२५ वर पोहोचली आहे. यामध्ये सन २०१९ मध्ये एकूण १६ हजार ३६० एवढ्या आगींसह इतर दुघर्टना घडल्या आहेत. यामध्ये एकाच वर्षात आगीच्या निव्वळ घटना ५ हजार ४२७ एवढ्या आहेत. तसेच उर्वरीत घटनांमध्ये रेस्क्यूसह घर आणि इमारत दुघर्टना आणि चुकीच्या वर्दी आदींचा समावेश आहे.

सन २०१६ पासून या तीन वर्षांमध्ये आगींसह इतर घटनांच्या ४७ हजार ४२५ वर्दी प्राप्त झाल्या असल्या तरी त्यातील निव्वळ आगींच्या घटना या केवळ १५ हजार १३९ एवढ्याच आहेत. त्यामध्ये सन २०१९ मध्ये आगींच्या निव्वळ घटना या ५ हजार ४२७ एवढ्या आहेत. ज्या मागील दोन वर्षांच्या तुलनेत पाचशे ते सहाशे घटना अधिक आहेत. याशिवाय इतर घटनांचा १३ हजार ५६४ वर्दी होती. तर रेस्क्युंच्या घटना १७ हजार ५२९ घटना घडल्या. तर घर कोसळणे, इमारत कोसळण्याच्या ९६४ घटना घडना घडल्या आहेत. मुंबई अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षांमध्ये आलेल्या वर्दीनुसार आग विमोचनासह इतर तिथे अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम अग्निशमन दलाचे जवान करत असतात. त्यामुळे घटनांमध्ये वाढ झालेली दिसली तरी त्यातील मनुष्यहानी आणि इतर मालमत्तांच्या नुकसानीचे प्रमाण कमीत कमी होण्यासाठी जवान शर्थीने प्रयत्न करत असल्याचे मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी व उपायुक्त प्रभात रहांगदळे यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

वर्षभरात रेस्क्यूच्या घटनाच अधिक

या वर्षभरात रेस्क्यूच्या एकूण ६ हजार ३३३२ घटना घडल्या आहेत. यामध्ये पक्षी, प्राणी यांच्यासह अनेक ठिकाणी अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठीच्या या वर्दी होत्या. आगींच्या घटनांपेक्षा रेस्क्युच्या घटनांमध्येही यावर्षी लक्षणीय वाढ झालेली आहे. मागील दोन वर्षांच्या घटनांच्या तुलनेत २०१९ मध्ये सर्वाधिक रेस्क्युच्या वर्दीमध्ये वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

चुकीच्या आगीच्या वर्दीच्या संख्येत वाढ

मुंबईतील आगींच्या वर्दीमध्ये ज्याप्रमाणे वाढ होत आहे, त्याच प्रमाणे चुकीच्या वर्दींच्या संख्येतही वाढ होवू लागली आहे. मागील तीन वर्षांमध्ये आगीच्या वर्दीच्या चुकीच्या कॉल्सची संख्या ५९ एवढी झालेली आहे. त्यामध्ये सन २०१९मध्ये ही वाढ लक्षणीय होवून ती संख्या ३६ वर पोहोचली आहे. त्याआधीच्या वर्षी म्हणजे सन २०१६ व २०१७मध्ये अनुक्रमे १२ व ११ एवढ्या चुकीच्या वर्दीचे कॉल्स प्राप्त झाले होते.

- Advertisement -

आगींसह इतर दुघर्टनांच्या तीन वर्षातील घटना : ४७४२५

सन २०१६-१७ : १५७०४
सन २०१७-१८ : १५३६१
सन २०१८-१९ : १६३६०

तीन वर्षातील आगींच्या घटना

एल-२-मध्यमस्वरुपाच्या : १५८
एल-३ -मोठ्या स्वरुपाची : ५०
एल-४-सर्वांत मोठ्या स्वरुपाची : १८
ब्रिगेड कॉल- गंभीर स्वरुपाची : १

तीन वर्षातील मोठ्यास्वरुपाच्या आगींच्या घटना : २२७

सन २०१६-१७ : ४६
सन २०१७-१८ : ८४
सन २०१८-१९ : ९७

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -