घरमुंबईअग्निशमन यंत्रणा प्रमाणपत्र नसल्यास होणार कारवाई; अग्निशमन दलाचा इशारा

अग्निशमन यंत्रणा प्रमाणपत्र नसल्यास होणार कारवाई; अग्निशमन दलाचा इशारा

Subscribe

 

मुंबई: मुंबईत आगीच्या दुर्घटना व त्यामुळे होणारी जिवीत, वित्तीय हानी रोखण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाने इमारती, सोसायटी, आस्थापना यांनी अग्निशमन यंत्रणा प्रमाणपत्र पालिका संकेतस्थळावर सादर करावेत, असे आवाहन मुंबई अग्निशमन दलामार्फत करण्यात आले आहे. ज्या इमारती किवा आस्थापना प्रमाणपत्र सादर करणार नाहीत, त्यांचे संबधित मालक/भोगवटादार हे कारवाईस पात्र ठरतील, असा इशारा प्रमुख अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर यांनी दिला आहे.

- Advertisement -

मुंबईतील आगीच्या दुर्घटना कमी करणे व रोखणे यासाठी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाने जनजागृतीवर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून अग्निशमन दलाने मुंबईतील इमारती आणि आस्थापनांना खबरदारी घेण्याचे निर्देश वेळोवेळी दिले आहेत. यादृष्टीने संबंधित रहिवासी इमारती व आस्थापनांमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यरत तथा सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र (नमुना ब) महापालिकेच्या संकेतस्थळावर सादर करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबईतील इमारती आणि आस्थापनांमध्ये अग्निप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजनांबाबतच्या नियमांचे पालन होत आहे की नाही, याकडे मुंबई महापालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाने लक्ष केंद्रीत केले आहे.ज्या इमारती किवा आस्थापनांचे प्रमाणपत्र सादर केले जाणार नाही त्यांचे संबधित मालक/भोगवटादार हे कारवाईस पात्र ठरतील, असेदेखील प्रमुख अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर यांनी अग्निशमन दलाच्या वतीने कळवले आहे.

- Advertisement -

मुंबईतील जवळपास सर्वच भागात गगनचुंबी इमारती आहेत. आग लागून जीवित व वित्तहानी होवू नये म्हणून, महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ चे कलम ३ (१) नुसार इमारतीमध्ये आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजनांवर भर देण्याचे आवाहन मुंबई अग्निशमन दलाने केले आहे. इमारत किंवा इमारतीच्या भागामधील आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक योजनेमधील प्रस्थापित अग्निशमन यंत्रणा उत्तम व कार्यक्षम स्थितीत असल्याबाबत परवानाप्राप्त अभिकारणाकडून कलम ३ (३) व नियम ४ (२) नुसार सहामाही प्रमाणपत्र (नमुना ब) वर्षातून दोनदा जानेवारी व जुलै महिन्यात प्राप्त करून घेणे हे बंधनकारक करण्यात आले आहे. सदर प्रमाणपत्र इमारतीचे मालक/ भोगवटादार यांनी मुंबई महापालिका संकेतस्थळावर सादर (अपलोड) करण्याच्यादेखील सूचना करण्यात आल्या आहेत.

असे अपलोड करा प्रमाणपत्र
मुंबई महापालिका संकेतस्थळावर (https://portal.mcgm.gov.in) मुखपृष्ठावरील ‘व्यवसायाकरिता’ या रकान्यात ‘परवानग्यांकरिता अर्ज’ येथे जावून त्यात ‘अग्निशमन दस्तऐवज’ या रकान्यात हे प्रमाणपत्र अपलोड करा.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -