घर क्राइम कांदिवलीच्या लालजी पाड्यात गोळीबारामुळे खळबळ, घटनेत एकाचा मृत्यू

कांदिवलीच्या लालजी पाड्यात गोळीबारामुळे खळबळ, घटनेत एकाचा मृत्यू

Subscribe

मुंबईतील कांदिवलीमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पश्चिम उपनगरांत असलेल्या कांदिवलीमध्ये लालजी पाडा परिसरात एका व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज (ता. 28 मे) सकाळी घडली.

मुंबईतील कांदिवलीमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पश्चिम उपनगरांत असलेल्या कांदिवलीमध्ये लालजी पाडा परिसरात एका व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज (ता. 28 मे) सकाळी घडली. सकाळी 8च्या सुमारास ही घटना घडल्याने लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत 32 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून आरोपी फरार झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे. (Firing in Kandivali’s Lalji pada, one person died in the incident)

हेही वाचा – शिवसेनेच्या ‘या’ आमदाराने साधला सुषमा अंधारेंवर निशाणा; म्हणाले, “गौतमी पाटील अन् सुषमा अंधारे…”

- Advertisement -

पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर घटनास्थळाचा पंचनामा करुन पोलिसांनी तत्काळ तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. गोळीबाराच्या घटनेमुळे कांदिवली लालजी पाडा परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे कांदिवली लालजी पाडा परिसरात मागील सहा ते सात महिन्यांतील गोळीबाराची ही दुसरी घटना आहे. याआधी 1 ऑक्टोबर 2022 रोजी गोळीबाराची घटना घडली होती. त्यावेळी त्या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला होता, तर तिघे जखमी झाले होते.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत तरुण या परिसरात पाणी विक्रीचा व्यवसाय करत होता. टँकरने पाण्याची मृत व्यक्ती विक्री करत होत आणि याच व्यवसायाच्या वादातून त्याची हत्या झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या घटनेचा कांदिवली पोलिसांकडून तपास सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

मागील वर्षी 01 ऑक्टोबरला कांदिवली पश्चिमेतील लालजी पाडा परिसरात गोळीबाराची घटना घडली होती. याच परिसरात मध्यरात्री अचानक गोळीबार करण्यात आला होता. त्यावेळी तब्बल चार राऊंड फायरिंग झाली होती. त्या गोळीबाराच्या घटनेत एकाचा मृत्यू झाला होता तर अन्य तिघे जखमी झाले होते. ती घटना मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घडली होती. लालजी पाडा परिसरात बाईकवरुन आलेल्या दोघांनी अचानक गोळीबार करण्यास सुरुवात केली. परस्परांमध्ये असलेल्या वादातून हा गोळीबार करण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला होता. यानंतर पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या दोन जणांना गुजरातमधून अटक केली होती.

- Advertisment -