Homeक्राइमFiring on Dog : सोसायटीतील कुत्र्यावर नागरिकाकडून गोळीबार, ओशिवरातील घटनेने खळबळ

Firing on Dog : सोसायटीतील कुत्र्यावर नागरिकाकडून गोळीबार, ओशिवरातील घटनेने खळबळ

Subscribe

मुंबई उपनगरातील ओशिवरा भागातील एका सोसायटीत त्याच सोसायटीत राहणाऱ्या भटक्या कुत्र्यावर (Community Dog) गोळी झाडण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रविवारी (ता. 29 डिसेंबर) मध्यरात्री ही घटना घडली असून या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई : राज्यात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. यामुळे काही भागांमध्ये या भटक्या कुत्र्यांच्या त्रासाने नागरिक हैराण झाले आहेत. ज्यामुळे अनेक नागरिकांकडून याबाबतची तक्रार पालिका प्रशासनाकडे करण्यात येत आहे. परंतु, या मुक्या जनावरांविषयी थोडीशी दया दाखवून त्यांना आपल्या सोसायटीत किंवा परिसरात राहण्यास जागा द्या, अशी विनंती प्राणी प्रेमींकडून किंवा प्राण्यांशी संबंधित संघटनांकडून करण्यात येत आहे. अशातच आता, मुंबई उपनगरातील ओशिवरा भागातील एका सोसायटीत त्याच सोसायटीत राहणाऱ्या भटक्या कुत्र्यावर (Community Dog) गोळी झाडण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रविवारी (ता. 29 डिसेंबर) मध्यरात्री ही घटना घडली असून या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Firing on Dog in the society by citizen incident happend in Oshiwara)

मिळालेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी (प.) येथील ओशिवरा परिसरात असलेल्या शांतीवन सोसायटीच वुल्फी नावाचा कुत्रा आहे. हा कुत्रा या सोसायटीतच वास्तव्यास असतो. मात्र, रविवारी मध्यरात्री हा कुत्रा भुंकू लागल्याने त्याचा हा भुंकण्याचा आवाज सहन न झाल्याने या सोसायटीत राहणाऱ्या एका नागरिकाने त्याच्या एअरगनमधून गोळी झाडली. ही गोळी त्या कुत्र्याच्या आरपार गेली. ज्यानंतर हा कुत्रा जोराने ओरडू लागला. पण यामुळे जाग आलेल्या काही मुलांनी मिळून त्याला तत्काळ रुग्णालयात नेले, ज्यानंतर वुल्फी नामक या कुत्र्यावर उपचार करण्यात आले. मात्र, अद्यापही या मुक्या जनावरावरील धोका टळला नसल्याची माहिती समोर आली आहे. परंतु. या घटनेनंतर प्राणी प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा… Fraud : आयफोनच्या नावाने फसवणूक करणार्‍या त्रिकुटाला अटक; गुन्हे शाखेची कारवाई

वुल्फी नामक या कुत्र्यावर एअरगनमधून याच सोसायटीत राहणाऱ्या पिता पुत्राने गोळी झाडली आहे. या प्रकरणी सोसायटीत राहणाऱ्या प्रशांत लक्ष्मेश्वर (वय वर्ष 52) आणि मुलगा आदित्य (वय वर्ष 26) यांना ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला या दोघांनाही असे कोणतेही कृत्य केले नसल्याचे सांगितले. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी त्यांचा गुन्हा मान्य केला आहे. तर, वुल्फी सारखा भुंकत असल्याने आणि त्याच्या भुंकण्याच्या त्रासामुळेच त्याच्यावर गोळी झाडल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामुळे या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत भारतीय न्याय संहिता कलम 325 (प्राण्याला मारणे किंवा अपंग करणे) आणि प्राणी क्रूरता कायद्यानुसार संशयितावर गुन्हा दाखल केला आहे. परंतु, या घटनेत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.


Edited By Poonam Khadtale