महापालिकेच्या उद्यानांत जखमींवर उपचार करण्यासाठी ‘प्रथमोपचार पेट्या’

या सर्व पेट्या उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने, पार्क या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत

Municipal Corporation processes 100 percent waste garbage Carbon footprint will be reduced by 20 percent

मुंबई महापालिकेच्या उद्यानात खेळताना, व्यायाम करताना अथवा फिरताना तोल जाऊन पडल्यास किरकोळ जखमी झाल्यास संबंधित व्यक्तीला, मुलांना तात्काळ ‘प्रथमोपचार’मिळणार आहेत. महापालिकेच्या उद्यानांमध्ये येणाऱया नागरिकांसाठी ‘मेघा श्रेय’ या संस्थेच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व म्हणून ३०० ‘प्रथमोपचार पेट्या’ देण्यात आल्या आहेत. या सर्व पेट्या उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने, पार्क या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. यासंदर्भातील माहिती पालिका उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

मुंबई महापालिकेची २२९ उद्याने, ४३२ मनोरंजन मैदाने, २६ पार्क व ३१८ मैदाने आहेत. या सर्वच ठिकाणी लहान मुले खेळतात. तरुण मंडळी, ज्येष्ठ नागरिक फिरतात. तर काही व्यायामपट्टू ओपन जिममध्ये व्यायाम करतात. मात्र लहान मुले खेळताना, एकमेकांचा धक्का लागून पडल्यास , तरुण मुले खेळताना, धावताना पडल्यास, ज्येष्ठ नागरिक कोणाचा धक्का लागून पडल्यास अथवा ठेच लागून किंवा तोल जाऊन पडल्यास त्यांना तात्काळ उपचार मिळत नाही. कारण की, अशा ठिकाणी ‘प्रथमोपचार पेट्या’ नसतात. त्यामुळे संबंधित जखमी व्यक्तीला जास्त शारीरिक वेदना होतात. जर जखमेतून रक्त निघत असल्यास त्याचा आणखीन त्रास त्या व्यक्तीला होतो. नेमकी ही बाब जाणून घेत पालिका उद्यान खाते व एक सामाजिक संस्था यांनी त्यावर चांगला तोडगा काढला आहे. पालिकेच्या उद्यानांमध्ये येणाऱया नागरिकांसाठी ‘मेघा श्रेय’ या संस्थेच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व म्हणून ३०० प्रथमोपचार पेट्या देण्यात आल्या आहेत. महापालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे)आश्विनी भिडे यांची बुधवारी भेट घेऊन ‘मेघा श्रेय’ या संस्थेच्या संस्थापक सीमा सिंग यांनी या प्रथमोपचार पेट्या सुपूर्द केल्या आहेत. पालिका उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुंबई महापालिकेच्‍या उद्यान विभागामार्फत सामाजिक दायित्‍वाच्‍या माध्‍यमातून विविध उपक्रम उद्यानांमध्‍ये राबविले जातात. उद्यानांमध्ये येणाऱया नागरिकांना अथवा मुलांना क्वचितप्रसंगी दुखापत झाल्यास त्यांना या प्रथमोपचार पेट्यांमधील औषध सामग्रीच्या माध्यमातून किरकोळ जखमी व्यक्तीना तात्काळ उपचार देणे शक्य होणार आहे. त्यामुळे त्या जखमी व्यक्तीलाही तात्काळ उपचार मिळल्याने मोठा दिलासा मिळणार आहे. प्राथमिक उपचार तात्काळ उपलब्ध व्हावेत, या हेतूनेच ‘मेघा श्रेय’ संस्थेने उद्यान विभागाला प्रथमोपचार पेट्या प्रदान करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिका उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे नागरिकांना जास्तीत-जास्त सोयी-सुविधा देण्यासाठी महानगरपालिका आणि सामुदायिक सामाजिक दायित्व (CSR) च्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये प्रामुख्याने मुंबईतील उद्याने / मैदाने / वाहतूक बेटे / रस्ता दुभाजक / पट्टी उद्याने इत्यादींचे सुशोभिकरण व मियावाकी पद्धतीने ४ लाखांपेक्षा अधिक देशी प्रजातींची वृक्ष लागवड केलेले वनीकरण यांचा समावेश आहे. सामुदायिक सामाजिक दायित्व (CSR) व दानशूर व्यक्तिंच्या मदतीने विरंगुळा आणि सोयी-सुविधांच्याही पलीकडे जाऊन संगीतमय सकाळ, राष्ट्रीय संगीत नाट्य केंद्र (NCPA) च्या सहकार्याने संगीतमय संध्या, मुंबईतील २४ विभागातील उद्यानांमध्ये मोफत वाचनालय अशा प्रकारचे विविध उपक्रम राबविण्यात आलेले आहेत, असे श्री. परदेशी यांनी नमूद केले.

मुंबई महापालिकेची २२९ उद्याने
४३२ मनोरंजन मैदाने,
३१८ मैदाने आहेत.
२६ पार्क
————————-–——-
एकूण १,००५