घरताज्या घडामोडीMucormycosis: मुंबईत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी

Mucormycosis: मुंबईत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी

Subscribe

मुंबईतील म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या दीडेशे पार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह देशभरात थैमान घातले आहे. दुसऱ्या लाटेचा कहर थांबत नाही तोवर तिसऱ्या लाटेचे संकेत देण्यात आले आहे. सध्या राज्यात म्युकरमायकोसिसचे (Mucormycosis) प्रमाण वाढता दिसत आहे. काल सोमवारी अमरावतीत म्युकरमायकोसिसचा पहिल्या बळीची नोंद झाली. आज मुंबईत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी नोंदवला गेला आहे.

मुंबईच्या केईएम रुग्णालयामध्ये (K.E.M. Hospital) ३६ वर्षीय रुग्णाचा म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू झाला आहे. तसेच मुंबईतील म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या १५०वर पोहोचली आहे. सध्या मुंबईत महापालिकेच्या केईएम रुग्णालय, सायन रुग्णालय, नायर रुग्णालय आणि कुपर रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शन आणि औषधांसाठी महापालिकेने विशेष व्यवस्था स्थापन केली आहे, जेणेकरून महापालिकेच्या रुग्णालयात याचा तुटवडा भासून नये.

- Advertisement -

म्युकरमायकोसिसची लक्षणे

  • डोळ्यांभोवती वेदना होणे किंवा डोळे लाल होणे
  • ताप येणे
  • डोकेदुखी
  • खोकला
  • श्वास घेण्यास त्रास होणे
  • रक्ताच्या उलट्या होणे
  • मानसिक स्थिती बदलणे

म्युकरमायकोसिसपासून वाचण्यासाठी काय कराल?

  • कोरोनातून बरे झाल्यानंतर सतत रक्तातीतल ग्लोकोजचे प्रमाणे पाहत रहा. त्याचबरोबर डायबेटिज असलेल्या रुग्णांनीही रक्तातील ग्लोकोजचे प्रमाण तपासत राहणे महत्त्वाचे आहे.
  • स्टिरोइ़डचा योग्य वापर करा. दररोज पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा वापर करा.
  • नाक,डोळ्यांसंबंधी कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. म्युकरमायकोसिसची लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करु नका.
  • नाकाच्या बाबततीत कोणतेही लक्षण दिलसे तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. कारण म्युकरमायकोसिसची सुरुवात नाकापासून होते.
  • म्युकरमायकोसिस झाल्यास त्वरित सुरु करा त्यात जास्त वेळ घालवू नका, असे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा – Corona Update: देशात २४ तासांत कोरोना मृत्यूच्या संख्येत उच्चांकी वाढ; आतापर्यंत २,७८,७१९ जणांचा मृत्यू


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -