अरुणाचल प्रदेशला मिळाले हक्काचे विमानतळ, पहिले लॅडिंग यशस्वी

इटानगरपासून होलोंगी विमानतळ १५ किमी अंतरावर आहे. उत्तर आसामच्या लखीमपूर जिल्ह्यात हे विमानतळ आहे. या विमानतळाचं उद्घाटन १५ ऑगस्ट रोजी होणार आहे.

अरुणाचल प्रदेशसाठी आजचा दिवस ऐतिहासिक म्हणावा लागले. कारण, राजधानी इटानगर येथील पहिल्या विमानतळावर आज विमान लॅडिंग परीक्षण करण्यात आले. यावेळी राज्यातील नागरिकांचं अभिनंदन करत मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं. इटानगरपासून होलोंगी विमानतळ १५ किमी अंतरावर आहे. उत्तर आसामच्या लखीमपूर जिल्ह्यात हे विमानतळ आहे. या विमानतळाचं उद्घाटन १५ ऑगस्ट रोजी होणार आहे. (FIRST FLIGHT LANDING FIRST TIME IN ARUNACHAL AIRPORT)

हेही वाचा – नुपूर शर्माच्या अटकेला स्थगिती, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

भारतीय विमान उड्डाण प्राधिकरण अंतर्गत अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरमध्ये असलेल्या होलोंगी ग्रीनफिल्ड विमानतळावर पहिल्यांदा विमान लॅडिंग परीक्षण घेण्यात आले. हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिडेटद्वारे बनवलेले डोर्नियर विमान आज सकाळी साडेदहा वाजता विमानतळावर लॅण्ड झाले. ज्यावेळी विमानतळावर विमान उतरले त्यावेळी पायलटांनी विमानतळावरी रनवे आणि इतर वैशिष्ट्यांचं कौतुक केलं.

यावेळी राज्याचे मुख्यमंत्री पेमा खांडू ट्विट करत म्हणाले की, जिथे इच्छा शक्ती असते तिथे मार्गही असतो. अरुणाचल प्रदेश हे मोठे पर्यटन क्षेत्र असले तरीही इथे विमानतळ नव्हते. मात्र, इथे विमानतळ होऊ शकते असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवला आणि त्यांनी येथे विमानतळ बनवले.

हेही वाचा – महागाईच्या मु्द्द्यावर संसदेपासून रस्त्यापर्यंत काँग्रेसचे आंदोलन, राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका

इटानगरच्या ग्रीनफिल्ड विमानतळासाठी ६४५ कोटींचा खर्च आला. भारतीय विमान उड्डाण प्राधिकरणाने हा खर्च केला. या २०० प्रवासांची या विमानतळाची क्षमता आहे. यामध्ये आठ चेक-इन काऊंटर आहे. तर, २ हजार ३०० मीटर रनवेसह हे राज्यातील पहिल विमानतळ आहे जिथे बोइंग ७४७ चं लॅडिंग होणार आहे. हे विमानतळ ४१०० चौरस मीटर क्षेत्रावर पसरले आहे.