घरमुंबईमुलांनो! तुमच्या FY प्रवेशाचा तिढा सुटला बरं का!

मुलांनो! तुमच्या FY प्रवेशाचा तिढा सुटला बरं का!

Subscribe

राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने F. Y. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय जाहीर केल्यानंतर मुंबई विद्यापीठाने F.Y. प्रवेशाचे सुधारीत वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार आता दुसरी गुणवत्ता यादी १४ जुलैला ( शनिवारी ) तर तृतीय आणि अंतिम गुणवत्ता यादी १८ जुलै २०१८ रोजी कॉलेजमध्ये लागणार आहे.

बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर महाविद्यालयीन आयुष्य एन्जॉय करण्यासाठी आणि भविष्याकडे एका पाऊल पुढे टाकण्यासाठी सज्ज झालेल्या मुलांसाठी आता एक खुशखबर आहे. अखेर शनिववारपासून F.Yची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. मुंबई विद्यापीठ संलग्नित अल्पसंख्याक कॉलेजांमध्ये मागासवर्गीय कोटा रद्द करण्यासंदर्भातील याचिकेविरोधात राज्य सरकारने दाद मागितली होती. अखेर राज्य सरकारची ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, राज्य सरकारने कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करून अतिरिक्त सॉलिसीटर जनरलकडे सल्ला मागणार असल्याचे जाहीर केले आहे. यापूर्वीच पहिली यादी जाहीर झाली असून दुसरी गुणवत्ता यादी १४ जुलैला ( शनिवार ) तर, तृतीय आणि अंतिम गुणवत्ता यादी १८ जुलै रोजी कॉलेजमध्ये लागणार आहे.

का रखडले होते प्रवेश?

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या अल्पसंख्यांक कॉलेजांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणारे आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर बंद झाले. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आणि मुंबई विद्यापीठाने उच्च न्यायालयाच्या निकालाविरुध्द सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने फेटाळून लावली. मात्र, राज्य सरकारच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात भारताचे अतिरिक्त सॉलिसीटर जनरल यांनी मांडलेला युक्तीवाद खंडपीठाने सहानुभूतीपूर्वक व सविस्तरपणे ऐकून घेतला. भारतीय राज्य घटनेतील २००६ची घटनादुरुस्ती यापूर्वीच न्यायालयाने मान्य केलेली आहे. या घटनादुरुस्तीच्या आधारावर अन्य याचिका न्यायालयाने यापूर्वीच फेटाळल्या असल्यामुळे सदर याचिका फेटाळावी लागत आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमध्ये मागासवर्गीयांना घटनात्मक आरक्षण कशा पध्दतीने देता येईल? यासंदर्भात राज्य शासन भारताचे अतिरिक्त सॉलिसीटर जनरल यांच्याकडे कायदेशीर सल्ला मागणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र शासनाच्यावतीने विशेष विनंती करून भारताचे अतिरिक्त सॉलिसीटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांना बाजू मांडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार त्यांनी शासनाची बाजू मांडली. तर, मुंबई विद्यापीठाच्या वतीने अतिरिक्त सॉलिसीटर जनरल पी. एस. नरसिम्हा यांनी बाजू मांडली.

१४ जुलैला दुसरी यादी

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय जाहीर केल्यानंतर मुंबई विद्यापीठाने F.Y. प्रवेशाचे सुधारीत वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार आता दुसरी गुणवत्ता यादी १४ जुलैला ( शनिवारी ( तर तृतीय आणि अंतिम गुणवत्ता यादी १८ जुलै २०१८ रोजी कॉलेजमध्ये लागणार आहे.

- Advertisement -

केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार

सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय विद्यार्थी संघटनांनी मान्य केला आहे. मात्र, याप्रकरणी लवकरच कायद्यात बदल करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे विद्यार्थी संघटनांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह लवकरच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेणार असल्याचे विद्यार्थी संघटनांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -