घरपालघर१ ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात

१ ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात

Subscribe

पालघर जिल्ह्यातील 2 हजारांहून बोटी सज्ज

गेले दोन महिने किनार्‍यावर नांगरलेल्या मासेमारी बोटी 1 ऑगस्टपासून समुद्रात जाऊन मासेमारी करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास 8 हजारांपेक्षा अधिक बोटींना मासेमारी करण्यासाठी परवानेही देण्यात आले आहेत. त्यामुळे खवय्यांना आतुरता लागून असलेल्या त्यांच्या आवडीच्या माशांवर पुन्हा एकदा ताव मारता येणार आहे.

पाऊस, वादळी वारा आणि उधाणामुळे 1 जून ते 31 जुलैपर्यंत मासेमारीला मत्स्यव्यवसाय विभागाकडून बंदी असते. त्यामुळे 1 जूनपासून मासेमारी बोटी समुद्रकिनार्‍यावर नांगरून ठेवलेल्या असतात. दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर 1 ऑगस्टपासून मासेमारीचा हंगाम पुन्हा सुरू होणार आहे. मासेमारीबंदीच्या काळात बोटीच्या इंजिनाची देखभाल दुरुस्ती व डागडुजी, बोटीची रंगरंगोटी होते. तसेच याच काळात जाळ्यांची दुरुस्ती व नवीन जाळ्यांची खरेदी मच्छीमारांकडून करण्यात आली असून बोटींना आकर्षक रंगाने, तसेच पताका लावून सजवण्यात आले आहे. त्यामुळेच आता जवळपास सर्वच बोटी समुद्रात जाण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

- Advertisement -

पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू, पालघर व वसई तालुक्यांतील 2032 बोटी 1 ऑगस्टपासून पुन्हा मासेमारी करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. मत्स्यव्यवसाय विभागाकडून बोटींना मासेमारी परवाने देण्यात आले आहेत. मासेमारी बोटीवर जाण्यासाठी खलाशी दाखल झाले आहेत.

आवश्यक परवाने प्राप्त
पालघर तालुक्यातील सातपाटी, मुरबा, एडवण माहीम, डहाणू तालुक्यातील डहाणू, धाकटी डहाणू तलासरी तालुक्यातील झाई तसेच वसई तालुक्यातील अर्नाळा, पाचूबंदरसह विविध बंदरावरील मासेमारी बोटींनी आवश्यक परवानगी व परवाने प्राप्त केले असल्याची माहिती पालघर येथील सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयाकडून देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -