घरमुंबईत्याने केलं होतं मन हलकं

त्याने केलं होतं मन हलकं

Subscribe

नातेवाईकांकडे केले होते मन हलकं
कॅन्सरचा विळखा अधिक घट्ट होण्याची जाणीव हिमांशु रॉय यांना झालीच होती, पण आपल्या नातलगांशी अशा कठीण काळातही एक आपुलकीचा शब्द सांगत त्यांनी आपल मन हलक केल होते. आपल्याकडे खूप कमी वेळ आहे याची जाणीव झाल्यानेच त्यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या स्नेही मित्रांना घरी बोलावले होते. मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करतो. सतेच त्यांनी सर्वांना भेटण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती. आपल्या शेवटच्या काळात सर्वांशी बोलाव, भेटी गाठी करणे अशी सांकेतिक तयारी त्यांनी आधीच मनात करून ठेवली होती.

आईची काळजी घ्यायचे
हिमांशु रॉय हे एक रॉयल शैलीतल जीवन जगत होते. पण त्यांचा आपल्या आईवर खूप जीव होता. मुंबई मध्ये आपल्या आईला नवीन ठिकाणी ते आवर्जून घेऊन जायचे. स्वतः कामात व्यस्त असतानाही अनेकदा आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने नवनवीन ठिकाणी नेण्याची विनंती ते करायचे. मग ते बांद्रा वरळी सी लिंक असो किंवा ट्राफिक टॉवर असो. शहरातली कोणतेही फिरण्याचे स्थळ दाखवण्यापासून चुकत नसे . हिमांशू रॉय यांचे सहकारी त्यांची आईंना घरी सोडून जायचे तेव्हा ते कधीच त्यांचे आभार मानायला विसरत नसे.

- Advertisement -

आध्यात्मिक हिमांशु रॉय
हिमांशु रॉय हे एक अध्यात्मिक व्यक्ती होते आणि त्यांची अंतिम धार्मिक विधी शास्त्रानुसार पार पडावी हीच आमची प्राथमिकता आहे. हिमांशु रॉय यांनी आपल्या स्ट्रगलिंग करीअर दरम्यान अनेकांच्या जीवनाला स्पर्श केला आहे. तुमच्या आजवर असलेल्या विश्वास आणि समर्थनाबद्दल आही तुमचे आभार मानतो. आम्ही लवकरच एका शोक सभेचं आयोजान करू तो पर्यंत आम्हाला थोडी तरी प्रायवसी द्या अशी विनंती करतो. हिमांशु रॉय यांचा पोलिस सेवेतला प्रवास हिंमतीचा होताच पण सच्चा देशभक्त म्हणूनही ते आयुष्यभर पोलिस सेवेत जगले. येणाऱ्या काळात आम्ही त्यांच्या पाऊलांवर चालायचा प्रयत्न करू.
– भावना रॉय, नेहल व्यास, अनिष त्रिपाठी, आमिष त्रिपाठी तसेच समस्त परिवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -