Tuesday, March 2, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात; ५ जणांचा मृत्यू, ५ जण जखमी

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात; ५ जणांचा मृत्यू, ५ जण जखमी

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कंटेनरचा भीषण अपघात झाला असून या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

Related Story

- Advertisement -

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ( Mumbai-Pune Expressway) कंटेनरचा भीषण अपघात (contener bus crash) झाला आहे. अपघातात पाच जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. खालापूर मुंबई लेनवर हा अपघात झाला असून अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भरधाव कंटेनरची चार वाहनांना धडक लागून हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

असा घडला अपघात?

मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर रात्री १ वाजण्याच्या सुमारास ट्रेलरने पाठमागून इनोव्हा, क्रेटा, टेम्पो आणि ट्रकला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. ट्रेलरने पाठीमागून पाच वाहनांना जोरदार धडक दिल्याने वाहने एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. पुण्याहून मुबंईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनाना कंटेनरने इनोव्हा, कार क्रेटा कार, टेम्पो आणि ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने पाच वाहनाचा विचित्र अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, अपघात ग्रस्त टीमचे सहकारी, देवदूत यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल होत वाहनांत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातामध्ये नवी मुंबईचे पशुवैद्यकीय अधिकारी वैभव झुंजारेंचा कुटुंबियांसह मृत्यू झाला आहे.

अपघातातील मृत्यू झालेल्यांची नावे

- Advertisement -

१) श्रीमती. मंजू प्रकाश नाहर, वय ५८, रा. इंद्रपुरी, ६०२, जवाहर नगर, एस.व्ही.रोड, गोरेगाव पश्चिम,
२) डॉ. वैभव वसंत झुंझारे, वय ४१, रा. ए/१-३,४, अधिकारी वसाहत, न.मु.महानगरपालिका, सेक्टर १५, नेरुळ, नवी मुंबई,
३) सौ. उषा वसंत झुंझारे, वय ६३, रा. ए/१-३,४, अधिकारी वसाहत, न.मु.महानगरपालिका, सेक्टर १५, नेरुळ, नवी मुंबई,
४) सौ. वैशाली वैभव झुंझारे, वय ३८, रा. ए/१-३,४, अधिकारी वसाहत, न.मु.महानगरपालिका, सेक्टर १५, नेरुळ, नवी मुंबई,
५) कु.श्रिया वैभव झुंझारे, वय-५, रा.ए/१-३,४, अधिकारी वसाहत, न.मु.महानगरपालिका, सेक्टर १५, नेरुळ, नवी मुंबई,
अ. नंबर १ ते ५ मयत झाले आहेत.

अपघातातील जखमी नावे

६) स्वप्नील सोनाजी कांबळे, ३० वर्षे, रा. फ्लॅट नं. २०१, इंद्रपुरी, जवाहर नगर, एस.व्ही.रोड, गोरेगाव (पश्चिम) (जखमी)
७) प्रकाश हेमराज नाहर, वय-६५, रा. इंद्रपुरी, ६०२, जवाहर नगर, एस.व्ही.रोड, गोरेगाव पश्चिम, (जखमी)
८) कु.अर्णव वैभव झुंझारे, वय-११, रा.ए/१-३,४, अधिकारी वसाहत, न.मु.महानगरपालिका, सेक्टर १५, नेरुळ, नवी मुंबई, (जखमी)
९) किशन चौधरी, (गंभीर जखमी)
१०) काळूराम जमनाजी जाट (गंभीर जखमी)


- Advertisement -

हेही वाचा – मुंबईकरांनो पुढील ७ दिवस महत्त्वाचे -मुंबई पालिकेचा इशारा


 

- Advertisement -