घरमुंबईमिथेन वायूमुळे पाच जणांनी जीव गमावला !

मिथेन वायूमुळे पाच जणांनी जीव गमावला !

Subscribe

ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर दु:खद घटना

कल्याणातील चक्कीनाका परिसरातील भीमा शंकर मंदिराशेजारी असलेल्या रसायनमिश्रीत विहिरीने पाचजणांचा बळी घेतलाय. सफाई कामगार कमलेश यादव (35), गुणा उर्फ गुणवंत गोस्वामी ( 60), राहुल गोस्वामी (28 ) या पितापूत्रांसह, प्रमोद वाघचौरे ( 35) आणि अनंत शेलार (45) हे अग्निशमन दलातील दोन फायरमनचा समावेश आहे. मिथेन या विषारी वायूमुळेच पाच जणांना जीव गमवावा लागल्याची माहिती अग्निशमन अधिकार्‍यांनी आपलं महानगरशी बोलताना दिली. मागील आठवडयात डोंबिवलीतील मॅनहॉलमध्ये पडून तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर घडलेल्या या दु:खद घटनेने कल्याण डोंबिवलीत हळहळ व्यक्त होत आहे.

भिमाशंकर मंदिराच्या शेजारी असलेली विहिर साफ करण्यासाठी सफाई कामगार किशोर यादव उतरला असतानाच तो खाली बुडाला त्याला वाचविण्यासाठी राहुल आणि त्यानंतर त्याचे वडील गुणा गोस्वामी गेले असताना तिघेही आतमध्ये बुडाले. अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले मात्र ते दोघेही विहिरीत उतरल्यानंतर त्यांचाही बळी गेला. विहिरीतील रसायनमिश्रीत विषारी वायूच्या उग्रवासामुळेच पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे नंतर स्पष्ट झाले. या परिसरात दोन रासायनिक कंपन्या आहेत. त्या कंपन्यांचे रसायनमिश्रीत पाणी गटारात सोडले जाते.

- Advertisement -

विहीरीच्या शेजारील गटाराचे काम अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे गटारातील सांडपाणी विहिरीत जावून विहिरीचे पाणी विषारी झाले होते. यासंदर्भात पालिका प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधींकडे अनेकवेळा तक्रारी केल्या होत्या. मात्र त्याची दखल घेतली नसल्याची नाराजी स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. तसेच गटारात मिथेन वायू तयार होतो त्या वायमुळेचे पाच जणांना जीव गमवावा लागल्याचे अग्निशमन दलाचे प्रमुख सुरेश शिंदे यांनी सांगितलं. वीजेचा शॉक लागून नव्हे तर विषारी वायूच्या वासामुळेच पाच जणांचा बळी गेल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. हा प्रकार समजताच अतिरिक्त अप्पर पोलीस आयुक्त प्रतापराव दिघावकर, खासदार श्रीकांत शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. संबधित कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी शिंदे यांच्याकडे केली.

गोस्वामी कुटूंबियांतील पिता पुत्रांचा मृत्यू

भीमा शंकर मंदिराला लागूनच ही विहिर आहे. गोस्वामी कुटूंब मंदिराची पूजा अर्चा करतात. गोस्वामी कुटूंबातील गुणा गोस्वामी आणि राहुल गोस्वामी हे पिता पूत्रांचा जीव गेल्याने गोस्वामी कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. गुणा हे मंदिरात पूजा अर्चा करायचे. तर राहूल हा खासगी काम करीत होता. सफाई कामगार विहिर साफ करण्यासाठी उतरला तेव्हा तो खाली बुडाला त्याला काढण्यासाठी राहुल धावला पण राहुलही आत गेल्यांनतर त्याचे वडील गुणा हे गेले. पण तिघेही आतमध्ये बुडाले असे गुणा यांचे पुतणे किशोर गोस्वामी याने सांगितले. पती आणि मुलगा दोघांनाही जीव गमवावा लागल्याने गीता गोस्वामी या धाय मोकलून रडत आहेत. गेल्या चार महिन्यांपासून गोस्वामी कुटूंबाने दुषीत विहिरीविषयी पालिका आणि लोकप्रतिनिधींकडे तक्रार केली आहे . मात्र या तक्रारीची दखल घेतली नाही त्यामुळे गोस्वामी कुटूंबियांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मात्र हा प्रकार घडल्यानंतर लोकप्रतिनिधी अधिकारी व प्रसारमाध्यमांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर गोस्वामी कुटूंबियांच्या रोषाला त्यांना बळी पडावे लागले. आता लोकांचा जीव गेल्यानंतर कशाला आले असा संतप्त सवाल त्यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -