घरताज्या घडामोडीनेरुळमध्ये भीषण दुर्घटना, इमारतीच्या सहाव्या मजल्यापासून पहिल्या मजल्यापर्यंत पाच स्लॅब कोसळले

नेरुळमध्ये भीषण दुर्घटना, इमारतीच्या सहाव्या मजल्यापासून पहिल्या मजल्यापर्यंत पाच स्लॅब कोसळले

Subscribe

आचानक घडलेल्या या प्रकारामुळे इमारतीमधील रहिवाशी आणि परिसरातील नागरिक यांची तांराबळ उडाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना ढिगाऱ्या बाहेर काढले आणि नजीकच्या डॉ. डी. वाय. पाटील तसेच अपोलो रुगणायात दाखल केले.

मान्सून सुरू होऊन आठवडाही उलटत नाही तोच नेरुळ सेक्टर १७ मध्ये शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली. जिमी पामाळ्यापर्यंतर्क इमारतीच्या ए विंगमधील सर्व घरांच्या हॉलचा स्लॅब सहाव्या माजल्यापासून ते पहिल्या माळ्यापर्यंत पत्त्याप्रमाणे कोसळला. यात एका तरूणाचा जागीच मूत्यू झाला आहे. तर सात रहिवाशी हे गंभीर जखमी झाले आहे. दुपारी आचानक घडलेल्या या प्रकारामुळे इमारतीमधील रहिवाशी आणि परिसरातील नागरिक यांची तांराबळ उडाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना ढिगाऱ्या बाहेर काढले आणि नजीकच्या डॉ. डी. वाय. पाटील तसेच अपोलो रुगणायात दाखल केले.

नेरुळ येथील सेक्टर १७ मधील जिमी पार्क ही इमारत सहा माळ्यांची आहे. या इमारतीला १९९४ साली महापालिकेने भोगवटा प्रमाणपत्र दिलेले आहे. शनिवारी दुपारी १२.४५ च्या सुमारास इमारतीच्या ए विंगमधील सहाव्या माळ्यावरील घराच्या हॉलचा संपूर्ण स्लॅब पाचव्या माळ्यावरील घरात कोसळला. त्यामुळे पाचव्या माळ्यावरील हॉलचा स्लॅबही खाली आला. अशा पध्दतीने पहिल्या माळ्यापर्यंत सर्वच घरातील हॉलचे स्लॅब कोसळले. या दुर्घटनेत व्यंकटेश नाडार (२९) हा तरूण जागीच ठार तर सुब्रमण्यम त्यागराजन (८४), निशा धर्मानी (५०), रिया धर्मानी (२०), सोनाली गोडबोले (२९), आदित्यराज गोडबोले (१५), सौमित्र गोडबोले (५०) आणि ललिता त्यागराजन (८०) हे सात जण जखमी झाले. त्यांना तातडीने नजीकच्या डॉ. डी. वाय. पाटील व अपोलो रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

जिमी पार्क इमारतीमध्ये दुर्घटना घडल्यानंतर नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाने आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सहाव्या माजल्यापासून ते पहिल्या माजल्यापर्यत हॉलचा स्लॅब पडल्यामुळे अनेक रहिवाशी घरांमध्ये अडकून पडले होते. त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सिडी लावून बाहेर काढले. घटनास्थळी रुग्णवाहिका, डॉक्टर, तसेच आग्निशामन दलाची वाहने तैनात होती. या दुर्घटनंची माहिती मिळाल्यानंतर महापालिका आयुक्त अभिजित बांगर, उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, शहर अभियंता संजय देसाई, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव पथकाला मार्गदर्शन केले. तर रहिवाशांना मदत व्हावी यासाठी आमदार मंदा म्हात्रे, माजी आमदार संदीप नाईक, पालिकेचे माजी सभागृह नेते रविंद्र इथापे, काँगेसचे संतोष शेट्टी आदि राजकीय नेत्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

जिमी पार्क इमारतीचे स्ट्रकचरल ऑडीट करून घेण्याबाबत या सोसायटीला महापालिकेने नोटीस दिली होती. मात्र या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलेले नाही. ही दुर्घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली, हे जाणून घेण्यासाठी तज्ञांचे पथक घटनास्थळी आले आहे. त्यांचा अहवाल उद्याापर्यंत उपलब्ध होईल. दुर्घटनाग्रस्त घरांतील सर्वच कुटूंबांच्या निवासाची पर्यायी व्यवस्था महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
अभिजित बांगर, आयुक्त नवी मुंबई मनपा

- Advertisement -

इमारती मधील रहिवाशांच्या माहिती प्रमाणे या इमारती मधील सहाव्या मजल्यावर हॉलच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. त्यामुळे ही घटना घडली असल्याचा अंदाज येथील रहिवाशांकडून वर्तवण्यात येत आहे. महापालिका आयुक्त यांनी देखील या घटनेबद्दलची तपास करुन माहिती घेण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.

जिमी पार्क सारख्या इमारतीचे स्ट्रकचरल ऑडिट करणार

1994 साली बांधण्यात आलेल्या या इमारती सारख्या अनेक इमारती नवी मुंबईत आहे. त्यांचे देखील पालिकेकडून स्ट्रॅकचरल ऑडिट करण्यात येणार आहे. विशेष करुन या बांधकाम व्यवासांयिकांने किती इमारती बांधल्या आहे. त्यांची माहिती घेऊन या इमारतीचे स्ट्रॅक्चक्चक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. स्ट्रॅकचरल ऑडिट चा रिपोट आल्यांनतर योग्य ती कारवाई करण्यात येईल.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -