घरमुंबईखड्डे दाखवून 'या' तरुणाने कमावले ५ हजार

खड्डे दाखवून ‘या’ तरुणाने कमावले ५ हजार

Subscribe

‘खड्डे दाखवा, ५०० रुपये मिळवा’ या पालिकेच्या मोहिमेत एका तरुणाने तब्बल ५ हजाराचे बक्षीस कमावले आहे.

मुंबई पालिकेने एक अनोखी योजना सुरू केली असून या योजनेचे नाव ‘खड्डे दाखवा, ५०० रुपये मिळवा’, असे आहे. या पालिकेच्या मोहिमेत एका मुलांनी तब्बल ५ हजाराची कमाई केली आहे. शिवाजी पार्क येथे राहणारा हा तरुण असून प्रथमेश चव्हाण असे या तरुणाचे नाव आहे. या तरुणाने खड्ड्यांबाबत सर्वाधिक म्हणजे तब्बल ५० तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीतील १० खड्डे पालिकेला २४ तासात बुजवणे अशक्य झाले असून उर्वरित खड्ड्यांसाठी त्याला बक्षीस देणे पालिकेला भाग पडले आहे.

१५५ जणांना मिळाले पालिकेकडून बक्षीस

महापालिकेने १ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत ‘खड्डे दाखवा, ५०० रुपये मिळवा’ ही मोहीम राबवली होती. या मोहिमेत तक्रार केल्यानंतर २४ तासात खड्डे बुजवले नाही तर ५०० रुपये अधिकाऱ्यांच्या किंवा कंत्राटदारांच्या खिशातून दिले जातील, असे प्रशासनाने जाहीर केले होते. त्यानुसार या मोहिमेत सुमारे दीड हजारांपेक्षा अधिक तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी ज्या खड्ड्यांच्या तक्रारी २४ तासात बुजवल्या गेल्या नाहीत अशा १५५ जणांना पालिकेला बक्षीस द्यावे लागले आहे. मात्र, यामध्ये सर्वाधिक किंमतीचे बक्षीस प्रथमेश चव्हाण यांने पटकावले आहे.

- Advertisement -

या भागात आढाळले अधिक खड्डे

पालिकेने जाहीर केलेल्या मोहिमेत या तरुणाने सहभाग घेण्याचे ठरवले होते. यासाठी त्यांनी एक संपूर्ण दिवस खड्ड्यांच्या तक्रारीसाठी खर्च केला. दुचाकीवरुन शिवाजी पार्कपासून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत तर सिद्धिविनायक मंदिरापासून ते धारावीपर्यंत प्रवास करत साडेचार तास खर्च करुन त्याने या तक्रारी केल्या. त्याला साने गुरुजी शाळेजवळ, शिवाजी पार्क परिसर आणि सिद्धिविनायक मंदिराच्या आतील रस्त्यांवर खूप मोठ्या प्रमाणावर खड्डे आढाळले आहेत.


हेही वाचा – दिवे घाटात वारकरी दिंडीत घुसला जेसीबी; नामदेव महाराजांचे वंशजांचे निधन

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -