घरCORONA UPDATEएसटीच्या पाच हजार कर्मचाऱ्यांना मिळणार प्रोत्साहन भत्ता

एसटीच्या पाच हजार कर्मचाऱ्यांना मिळणार प्रोत्साहन भत्ता

Subscribe

जोखीम पत्करून काम करणारे एसटीचे चालक-वाहकांना एसटी महामंडळाने बीएमसी आणि पोलीस कर्मचाऱ्यांप्रमाणे ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याची घोषणा परिवहन मंत्री अँड. अनिल परब यांनी केली होती.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतूक करणाऱ्यासाठी एसटी सुरु आहेत. त्यामुळे जोखीम पत्करून काम करणारे एसटीचे चालक-वाहकांना एसटी महामंडळाने बीएमसी आणि पोलीस कर्मचाऱ्यांप्रमाणे ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याची घोषणा  परिवहन मंत्री अँड. अनिल परब यांनी केली होती. त्यानंतर गुरुवारी एसटी महामंडळाने परिपत्रक काढत एसटी कर्मचाऱ्यांना वेतनाबरोबरच प्रोत्साहन भत्ता अंदाज करण्याचे निर्देश एसटी सर्व विभागीय कार्यालयाला देण्यात आले आहेत.

कोरोना विषाणूमुळे २३ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. कोरोना विषाणूविरोधात लढाईत वैद्यकीय सेवा बजावणारे डॉक्टरर्स, परिचारिका महापालिका, पोलीस, बँक, महाराष्ट्र शासन व इतर कर्मचारी अत्यावश्यक सेवेकरिता कार्यरत आहेत. या सर्व अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुंबई, ठाणे, रायगड व पालघर या जिल्ह्यातून कर्तव्यावर येण्यासाठी व त्यानंतर पुन्हा घरी जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने बसेस अत्यावश्यक सेवा म्हणून चालविण्यात येत आहे. या अत्यावश्यक सेवेत काम करणारे चालक / वाहक, वाहतूक नियंत्रक, कार्यशाळा कर्मचारी व इतर संबंधित कर्मचारी, अधिकारी हे देखील अत्यावश्यक सेवा म्हणून जीवाची पर्वा न करता कर्तव्य पार पाडत आहे.

- Advertisement -

म्हणूनच अतिशय संकटाच्या कालावधीत सेवा बजावणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना तसेच इतर विभागातून मदतीसाठी आलेल्या व प्रत्यक्ष कामगिरी बजावत असलेल्या सदर कर्मचाऱ्यांना ३०० रूपये विशेष प्रोत्साहन भत्ता देण्याची घोषणा परिवहन मंत्री अँड. अनिल परब यांनी केली होती. मात्र, एसटी महामंडळाकडून या संबंधित परिपत्रक काढण्यात आले नव्हते. परंतु गुरुवारी एसटी महामंडळाने परिपत्रक काढत एसटी कर्मचाऱ्यांना वेतनाबरोबरच प्रोत्साहन भत्ता अंदाज करण्याचे निर्देश एसटी सर्व विभागीय कार्यालयाला देण्यात आले आहेत. हा विशेष प्रोत्साहन भत्ता २३ मार्च २०२० पासून ते संचार बंदी उठेपर्यंतच्या कालावधीपर्यंत कर्तव्य बजावणाऱ्या जवळ जवळ पाच हजार एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -