Eco friendly bappa Competition
घर मुंबई Flood Alert-2023 : मुंबई महापालिकेची 'आयफ्लोज प्रणाली' सज्ज; पुराची देणार आगाऊ माहिती

Flood Alert-2023 : मुंबई महापालिकेची ‘आयफ्लोज प्रणाली’ सज्ज; पुराची देणार आगाऊ माहिती

Subscribe
मुंबई: Flood Alert-2023  यंदाच्या पावसाळ्यासाठी मुंबईतील नागरिकांच्या सुविधेसाठी ‘आयफ्लोज प्रणाली’ उपलब्ध कण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग आणि राष्ट्रीय समुद्रीतट संशोधन केंद्र यांच्यामार्फत संयुक्तरित्या पूर प्रवण क्षेत्राची आगाऊ सूचना देणारी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
तसेच, नागरिकांच्या मदतीसाठी आपत्कालीन कक्षासोबत संपर्क साधण्यासाठी हॉटलाईन्स, आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरता निवारा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथके आणि मोबाईल अँप यासारख्या सुविधाही उपलब्ध कण्यात आल्या आहेत. त्यासोबतच २४ प्रशासकिय कार्यालयांमध्ये ‘विभागीय नियंत्रण कक्ष’ कार्यान्वित करण्यात आली आहेत.     मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या निर्देशांनुसार महापालिकेच्या मुख्य आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या धर्तीवर सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये विभागीय नियंत्रण कक्ष प्रथमच स्वतंत्र मनुष्यबळासह सुसज्ज करण्यात आले आहेत. त्यासोबतच ५८ हॉट लाईन्सची सुविधा ही महापालिकेची २४ प्रशासकीय विभाग कार्यालये, ६ मोठी रुग्णालये व २८ बाह्य यंत्रणांना जोडण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहे.
    मुंबईत बसविण्यात आलेल्या ५,३६१ सिसिटीव्ही कॅमे-यांचे थेट प्रक्षेपण पहाण्याकरिता व्हिडीओ वॉलची सुविधा आपत्कालीन कक्षात उपलब्ध आहे. तसेच आपत्ती प्रसंगी रेल्वे वाहतूक व्यवस्था कोलमडल्यास विविध रेल्वे स्थानकांवर अडकून पडलेल्या प्रवाशांकरिता, तसेच आपत्तीमुळे बेघर झालेल्या नागरिकांकरिता तात्पुरते आश्रय मिळावा म्हणून प्रत्येक विभागात ५ शाळांमध्ये निवाऱयांची व्यवस्था करण्याच्या सूचना सह आयुक्त (सामान्य प्रशासन)  मिलिन सावंत यांनी दिल्या आहेत.

महापालिकेचे नियोजन

# ५८ हॉट लाईन्स: महापालिकेची २४ प्रशासकीय विभाग कार्यालये, ६ मोठी रुग्णालये व २८ बाहय यंत्रणांना जोडणा-या ५८ हॉट लाईन्स कार्यरत
# आणीबाणी प्रसंगी महापालिका आयुक्त, सर्व अतिरिक्त आयुक्त, परिमंडळीय उपायुक्त व विभागीय सहाय्यक आयुक्त यांच्यातील संदेशवहन सुलभ व्हावे, याकरिता अतिमहत्वाच्या ६१ ठिकाणांसह संबधित वरिष्ठ अधिका-यांच्या वाहनांमध्ये अत्याधुनिक डिजीटल मोबाईल रेडीओ प्रणाली कार्यान्वित.
# हेल्पलाईन क्रमांक १९१६: १९१६ क्रमांकाच्या ३० लाईन्स हंटींग सुविधेसह तत्पर
# थेट दूरध्वनी क्रमांक – २२६९४७२५ / २७, २२७०४४०३ फॅक्स- २२६९४७१९
#  सर्व विभागीय नियंत्रण कक्षांमध्ये त्या-त्या प्रशासकिय विभागाचा आपत्कालीन आराखडा तयार ठेवण्यात आला आहे.
#  पर्जन्य जलवाहिन्या विभागामार्फत शहर व उपनगरात ४७७ ठिकाणी पाण्याचा उपसा करणारे उदंचन संच बसविण्यात आले आहेत.
#  समुद्रावरील सुरक्षितता -:मान्सुन कालावधीत समुद्रास येणा-या मोठ्या भरतीच्या दिवशी नागरिक समुद्रात बुडण्यासारख्या दुर्देवी घटना घडू नयेत, याकरिता ६ समुद्रकिना-यांवर जीवरक्षकांसह अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान, पोलीस पेट्रोलिंग वाहने तैनात असणार आहेत.
# थलसेना तैनात -:
थलसेनेचे ५ कॉलम आणीबाणी परिस्थिती उद्भवल्यास त्वरीत मदतीकरिता तत्पर ठेवण्यात आले आहेत.
• या तुकडयांकडे बोटी, ओबीएम व लाईफ जॅकेट्स उपलब्ध आहेत.
नौदल
• कुलाबा, वरळी, मालाड, मानखुर्द आणि घाटकोपर येथे नौदलाची ५ पूर बचाव पथके तैनात आहेत.
• नौदलाचे १ पाणबुडी पथक कुलाबा येथे तर २ पथके उरण येथे तैनात आहेत.
• कुलाबा येथे चेतक व सी-किंग नावाचे हेलिकॉप्टर मदतीकरिता तत्पर आहे.
• आणीबाणी प्रसंगी शोध व बचाव कार्यासाठी एक स्वतंत्र जहाज तैनात आहे.
• कुलाबस्थित आयएनएस आंग्रे येथील नौदलाच्या सागरी सुरक्षा मुख्यालयात आपत्ती नियंत्रण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.
• महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून मदतीचा संदेश जाताच नौदलामार्फत खालील सुविधा पुरविण्यात येतीलः-
• मुंबईकरिता पूर बचाव पथके
• पाणबुडे
• समुद्रातील शोध व बचाव कार्य
• जहाज व हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बाधितांना सुरक्षित स्थळी हलविणे
• मदत साहित्याचे वितरण
• भारतीय तटरक्षक दल
• भारतीय तटरक्षक दलाची ४ पथके मान्सून कालावधी दरम्यान सज्ज ठेवण्यात आली आहेत. ही पथके कुलाबा, वरळी व मानखुर्द येथे तैनात आहेत.
• या पथकांकडे तरंगणारे तराफे, लाईफ जॅकेट्स, दोरांसह लाईफ बुआईज, प्रथमोपचार संच उपलब्ध असतील.
• तटरक्षक दलाचा निशुल्क हेल्पलाईन क्रमांक १९५४ आहे.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक

मुंबईत कोणत्याही प्रकारची आणिबाणी परिस्थिती उद्भवल्यास त्वरीत मदतकार्याकरिता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या ३ तुकडया अंधेरी क्रीडा संकुल येथे तैनात आहेत. सन २०२३ च्या मान्सुनकरिता जास्त धोकादायक दरडी कोसळण्याची शक्यता असणा-या एम/पश्चिम, एन आणि एस विभागांकरिता दोन जादा पथके ८ जूनपासून तैनात करण्यात आली आहेत.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -