घरमुंबईनियम पाळा लॉकडाऊन टाळा, मुख्यमंत्र्यांनी दिले ८ दिवसांचे अल्टिमेटम

नियम पाळा लॉकडाऊन टाळा, मुख्यमंत्र्यांनी दिले ८ दिवसांचे अल्टिमेटम

Subscribe

कोरोना युद्ध जिंकण्यासाठी मास्क हीच आपली ढाल - मुख्यमंत्री

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्याची वाटचाल कोरोना संकटातून मुक्तीकडे होत असताना पुन्हा एकदा कोरोना हातपाय पसरत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधला. नाशिक, अमरावती,अकोला जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नाशिकमध्ये उद्यापासून रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी लावण्यात आली आहे तर अमरावतीमध्येही उद्यापासून पुढील ७ दिवस लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात मागील आठवड्यापासून कोरोना रुग्णांचा आकडा वाढतो आहे. तसेच कोरोनामुळे मृतांच्या संख्येतही भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. यावर आता मुख्यमंत्र्यांनी असे म्हटले आहे की,नियम पाळा लॉकडाऊन टाळा तसेच मुख्यमंत्र्यांनी ८ दिवसांचे अल्टिमेटम दिले आहे. नागरिकांनी कोरना नियमांचे पालन केले नाहीतर लॉकडाऊन हाच शेवटचा पर्याय असेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, पुढील महिन्यात कोरोनाला १ वर्ष पुर्ण होईल. लॉकडाऊन करुन नागरिकांना घरामध्ये बंद करुन ठेवण कुणालाही आवडणार नाही. आपण सर्वजण मागील १ वर्षांपासून कोरोना संकटाशी लढतो आहे. कोरोनाशी लढण्यासाठी आणि कोरोनावर मात करण्यासाठी लसीची निर्मिती करण्यात आली आहे. देशात कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाली असून ही दिलासा देणारी बाब आहे. तसेच मागील महिन्यापासून देशासह राज्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे.

- Advertisement -

राज्यात आतापर्यंत ९ लाख कोरोना योद्ध्यांना लस देण्यात आली आहे. कोरोना लस दिलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये कोणताही घातक परिणाम अद्याप आढळला नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राज्यात काही कोरोना योद्ध्यांनी कोरोना लस अजूनही घेतली नाही आहे. अशा कोरोना योद्ध्यांनी तातडीने लस घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. देशातून साऊथ आफ्रिकेत पाठवलेल्या कोरोना लसींचे डोस पुन्हा भारतात पाठवण्यात आले आहेत. या लसीचे डोस देशासाठी उपयोगी ठरतील. तसेच आणखी काही डोस राज्याला मिळणार आहेत. त्यामुळे ते डोस मिळाल्यावर राज्यातील सामान्य नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यात येईल.

कोरोना योद्ध्यांनी लस घेतली तर मास्क वापरणे अनिवार्य असणार आहे. राज्यात कोरोना पुन्हा डोक वर काढतो आहे. त्यामुळे कोरोनाची शिस्त मोडून चालणार नाही. मास्क वापरणे, सुरक्षित अंतर पाळणे, सॅनिटायझर वापरणे या शिस्तीचे पालन केले पाहिजे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. पाश्चिमात्य देशांतही पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडायची असेल तर संपर्क टाळण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे.

- Advertisement -

परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्वारंटाईन करण्यात येणार आहे. जनतेच्या हितासाठी प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच राज्यात मोठ्या थाटात आणि गर्दी करुन होणाऱ्या विवाह सोहळ्यांना गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच मुंबईत मोठं-मोठे हॉल, मंगल कार्यालयांमध्ये नियमावली कडक केली आहे. या बँक्वेट हॉल आणि मंगल कार्यालयांत नियमांचे उल्लंघन केले तर मालकांवर कारवाई होणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : उद्यापासून राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांवर बंदी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यात मागील महिन्यात आणि काहि दिवसांपूर्वी रुग्णसंख्या कमी होती. परंतु आता रुग्ण संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. कोरोना काळात कोविड योद्ध्यांनी चांगले योगदान दिले आहे. नियमांचे पालन करुन याच कोविड योद्ध्यांना कोरोनाला हरवण्यासाठी साथ देण्याचे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

राज्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आज महाराष्ट्रात ७ हजार नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट दरवाजावर धडक देते आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे निर्बंध कडक करावे लागत आहेत.

हेही वाचा : राज्यात नागपूरसह तीन राज्यात ‘नाईट कफ्यू’ ? वडेट्टीवारांचे संकेत

कार्यालयातील गर्दी टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यासाठी कार्यालयाने मुभा द्यावी तसेच कार्यालयाच्या वेळेची विभागणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. तसेच जर जनेतने कोरोना नियमांचे पालन केले नाहीतर पुढील ८ दिवसांनी लॉकडाऊन लावण्याचा विचार केला जाईल. नियम पाळा आणि कोरोना टाळा असेही मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -