घरमुंबईभांडुप विषबाधा प्रकरण; पाण्यातील ‘ई कोलाय’मुळे विषबाधा

भांडुप विषबाधा प्रकरण; पाण्यातील ‘ई कोलाय’मुळे विषबाधा

Subscribe

भांडुप येथील सह्याद्री विद्या मंदिरमधील 18 मुलांना व मदतनीस महिलेला विषबाधा झाल्याने 16 ऑगस्टला मुलुंडमधील एम. टी. अगरवाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना माध्यान्ह्य भोजनातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक दावा करण्यात येत होता. मात्र ही विषबाधा माध्यन्ह्य भोजनातून नव्हे तर पाण्यात असलेल्या ‘ई कोलाय’ या विषाणूंमुळे झाल्याचे तपासणीत समोर आले आहे.

सह्याद्री विद्या मंदिर शाळेतील सकाळच्या सत्रातील सातवी ‘क’ वर्गातील 16 विद्यार्थी व मदतनीस यांना 16 ऑगस्टला माधान्ह्य भोजन खाल्ल्यानंतर उलटी व पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यांना मुलुंडमधील एम. टी. अगरवाल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर पुढील दोन दिवसांमध्ये अन्य दोन मुलांना आणण्यात आले. मुलांना शाळेत देण्यात येणारी डाळ-खिचडी खाल्ल्यानेच त्यांना उलटी व पोटदुखीचा त्रास झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे महापालिकेने व अन्न आणि औषध प्रशासनाने शाळेतील डाळ-खिचडी व पाण्याचे नमूने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. ही खिचडी लिंगेश्वर महिला बचत गटाकडून शाळेला पुरवण्यात आली होती. त्यामुळे या बचत गटावरही कारवाई करण्यात आली होती. परंतु नमून्यांची तपासणी केल्यानंतर डाळ-खिचडीमध्ये काहीच आढळून आले नाही तर, शाळेच्या पाण्यामध्ये ‘ई कोलाय’ हा विषाणू आढळून आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना डाळ-खिचडी खाल्ल्याने विषबाधा झाली नसून, दूषित पाण्यामुळे त्रास झाला आहे, अशी माहिती पालिकेच्या अधिकार्‍यांनी दिली.

काय आहे ‘ई कोलाय’
पाण्याच्या नमुन्यांमध्ये ‘ई कोलाय’ हा जीवाणू आढळून येतो. यामुळे गॅस्ट्रो, अतिसार, कावीळसारखे जलजन्य आजार होण्याचा धोका असतो. ‘ई-कोलाय’ हा मानव आणि प्राण्याच्या शरीरात आढळतो. ई-कोलायचे अनेक प्रकार आहेत. त्यामधील बरेचसे निरुपद्रवी, काही उपयोगी आणि काही मात्र घातकदेखील असतात. केरोटॉक्सिन (व्ही.टी) हा एक अतिशय महत्त्वाचा आणि विषारी असा ई-कोलाय हा जिवाणू पाण्यात आढळल्यास त्यामुळे अनेक आजार होतात.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -