Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी कुरार व्हिलेज, अप्पापाडा परिसरात तीन महिन्यांत तिसऱ्यांदा आग, झोपड्या खाक

कुरार व्हिलेज, अप्पापाडा परिसरात तीन महिन्यांत तिसऱ्यांदा आग, झोपड्या खाक

Subscribe

मालाड (पूर्व), कुरार व्हिलेज येथील झोपडपट्टीत मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास नागरिक गाढ झोपेत असताना अचनाकपणे एका घरात आग लागली. ही आग बघता बघता झोपडपट्टीत पसरली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. झोपडीधारकांना आपले व कुटुंबियांचे प्राण वाचविण्यासाठी झोपडीबाहेर सुरक्षित ठिकाणी धाव घ्यावी लागली. या घटनेत ८ - १० झोपड्या जळाल्या.

मुंबई : मालाड (पूर्व), कुरार व्हिलेज येथील झोपडपट्टीत मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास नागरिक गाढ झोपेत असताना अचनाकपणे एका घरात आग लागली. ही आग बघता बघता झोपडपट्टीत पसरली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. झोपडीधारकांना आपले व कुटुंबियांचे प्राण वाचविण्यासाठी झोपडीबाहेर सुरक्षित ठिकाणी धाव घ्यावी लागली. या घटनेत ८ – १० झोपड्या जळाल्या. सुदैवाने कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. मात्र कुरार व्हिलेज, अप्पापाडा परिसरात गेल्या तीन महिन्यांत झोपड्यांना आग लागल्याची घटना तिसऱ्यांदा घडली आहे. (For the third time in three months fire destroyed huts in Kurar Village Appa Pada area)

मिळालेल्या माहितीनुसार, मालाड (पूर्व), आप्पापाडा, कुरार व्हिलेज डॉ.आंबेडकर नगर चाळीत मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास झोपडपट्टीतील नागरिक गाढ झोपेत असताना एका घरात अचानकपणे आग लागली. ही आग बघता बघता हळूहळू पसरली. त्यामुळे झोपेतून खडबडून जागे झालेल्या झोपडीधारकांची आपला व कुटुंबीयांचा जीव वाचविणे, घरातील महत्वाचे कागदपत्रे वाचविणे यासाठी एकच धावपळ झाली.

- Advertisement -

या आगीत किमान ८ – १० झोपड्या जळल्याचे वृत्त आहे. या झोपडयांमधील इलेक्ट्रिक सामान, वायरिंग, उपकरणे, लाकडी सामान, कपडे आदी महत्वाचे सामान जळून खाक झाले. दरम्यान, या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ आगीच्या घटनास्थळी धाव घेतली व युद्धपातळीवर बचावकार्य केले. फायर इंजिन व पाण्याचे टॅंकर यांच्या साहाय्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी सदर आगीवर अथक प्रयत्नांनी नियंत्रण मिळवून आग विझविली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. परंतु मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले. मात्र ही आग का व कशी काय लागली, याबाबत स्थानिक पोलीस, अग्निशमन दल व महापालिका अधिकारी हे तपास करीत आहेत.

- Advertisement -

गेल्या तीन महिन्यांत झोपड्यांना तिसऱ्यांदा आग

मालाड (पूर्व) अप्पापाडा, कुरार व्हिलेज या परिसरातील झोपडपट्टीमध्ये गेल्या तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. पहिली घटना १३ फेब्रुवारी रोजी मालाड (पूर्व) कुरार व्हिलेज डोंगराळ भागात सकाळच्या सुमारास भीषण आग लागली होती. सदर घटनेत त्यावेळी गंभीर जखमी एका बारा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तर अन्य चार जण जखमी झाले होते.

आगीची दुसरी घटना १३ मार्च रोजी दुपारच्या सुमारास मालाड (पूर्व) आनंद नगर, आप्पापाडा येथील झोपडपट्टीत गॅस सिलिंडरचे स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली होती. सुदैवाने सदर घटनेत कोणीही जखमी झाले नव्हते. तसेच, आगीची तिसरी घटना मंगळवारी २३ मार्च रोजी मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास मालाड (पूर्व), आप्पापाडा, कुरार व्हिलेज येथील झोपडपट्टीत भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.


हेही वाचा – कोल्हापुरातील एका इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

- Advertisment -