घरमुंबई69 कोटी रुपयांच्या कोकेनसह विदेशी नागरिकाला अटक, आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयची कारवाई

69 कोटी रुपयांच्या कोकेनसह विदेशी नागरिकाला अटक, आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयची कारवाई

Subscribe

विदेशात मोठ्या प्रमाणात कोकेनची तस्करी (Cocaine smuggling) होणार असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या अधिकार्‍यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमातळावर विदेशातून येणार्‍या प्रत्येक प्रवाशांसह त्यांच्या बॅगेची तपासणी सुरु केली होती.

सुमारे 69 कोटी रुपयांच्या कोकेनसह (cocaine) एका विदेशी नागरिकाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) महसूल गुप्तचर विभागाच्या (डीआरआय) अधिकार्‍यांनी ( Revenue Intelligence) अटक केली. आर्टस बिनबर्ग्स (Arts Binberg) असे या विदेशी नागरिकाचे नाव असून त्याच्याकडून या अधिकार्‍यांनी 6.90 किलो वजनाचा कोकेनचा साठा जप्त केला आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने 21 जूनपर्यंत डीआरआय कोठडी सुनावली आहे.

विदेशात मोठ्या प्रमाणात कोकेनची तस्करी (Cocaine smuggling) होणार असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या अधिकार्‍यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमातळावर विदेशातून येणार्‍या प्रत्येक प्रवाशांसह त्यांच्या बॅगेची तपासणी सुरु केली होती. आर्टस हा विमानतळावर आल्यानंतर बाहेर जाण्याच्या तयारीत होता. यावेळी त्याला या अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात महिलांच्या काही चप्पला आणि किसोबोरचे पाच पुठे आढळले.

- Advertisement -

किसोबोरच्या पाकिटात त्याने कोकेन लपवून आणले होते. त्यातून या अधिकार्‍यांनी 6.90 किलो वजनाचे कोकेनचे जप्त केले. त्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 69 कोटी रुपये इतकी आहे. तपासात आर्टस हा रिपब्लिक देशाचा नागरिक असून तो सो पॉलो व्हाया दोहा येथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्याचे उघडकीस आले. त्याला कोकेन तस्करीसाठी काही ठराविक रक्कमेचे कमिशन मिळणार होते. हा साठा त्याला विमानतळाबाहेर एका व्यक्तीला द्यायचा होता.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -