घरताज्या घडामोडीदेवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त झाले; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त झाले; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

Subscribe

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांना मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज कोरोनामुक्त झालेल्या देवेंद्र फडणवीस यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. २४ ऑक्टोबर रोजी संसर्ग झाल्यानंतर उपचारासाठी ते रुग्णालयात दाखल झाले होते.

कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून देवेंद्र फडणवीस हे सातत्याने दौऱ्यावर होते. सरकारी आरोग्य अनास्थेविरोधात आवाज उचलत होते. कोरोना चाचण्या वाढविण्यापासून ते कोरोनामुळे होणारे मृत्यूच्या संख्येत फेरफार केल्याबाबत फडणवीस यांनी आवाज उचलला होता. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वारंवार पत्र लिहिली होती. तसेच पावसाळी अधिवेशनादरम्यान आरोग्याच्या प्रश्नावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले होते.

- Advertisement -

“लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी!”, असे ट्विट फडणवीस यांनी कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -