घरमुंबईमुंबई महापालिकेचे माजी आयुक्त शरद काळे यांचे निधन

मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त शरद काळे यांचे निधन

Subscribe

मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त शरद काळे यांचे शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात निधन झाले.

मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त शरद काळे (८३) यांचे शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शरद काळे यांनी मुंबई महापालिकेत १९९१ – ९४ या कालावधीत मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी काम केले. कडक शिस्त, अभ्यासू, प्रामाणिकपणा यांच्या शिदोरीवर आपली आयुक्त पदाची कारकीर्द मुंबई महापालिकेत त्यांनी चांगलीच गाजवली. त्यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९३९ रोजी पुण्यात झाला. त्यांनी आपले शालेय शिक्षण नूतन मराठी विद्यालयात पूर्ण केले. १९९२ – ९३ ला ते आयुक्त असताना मुंबईत दंगल झाली होती. मात्र त्या दंगलीच्या प्रसंगीही मुंबईचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात आला होता.

- Advertisement -

( हेही वाचा: पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवरून आघाडीत मतभेद )

शरद काळे हे आयुक्त पदावर कार्यरत असताना त्यांची मुलगी डॉक्टर म्हणून मुंबई महापालिकेच्या केईएम व नायर रुग्णालयात कार्यरत होती. ते आयुक्त पदावरून निवृत्त झाल्यावर त्यांनी आपल्या घराजवळील यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये फक्त एक रुपये मानधन या तत्वावर काम केल्याचे पालिकेच्या माजी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख तलावांपैकी तानसा तलावाचा शताब्दी सोहळा १९९२ ला साजरा करण्यात आला. त्यांच्या कार्यकाळात धरणांचे मजबुतीकरण, मुंबईला अतिरिक्त पाणी पुरवठा, पांजरापुर जल शुध्दीकरण प्रकल्प आदी महत्वाची कामे करण्यात आली. व महापालिकेत सर्व अधिकारी, कर्मचारी, सर्वपक्षीय नगरसेवक आयुक्त शरद काळे यांचा मानसन्मान राखत असत. मुंबई महापालिकेतील तत्कालीन उपायुक्त गो. रा. खैरनार यांनी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांच्या बेकायदा मालमतेवर हातोडा उगारल्या नंतर त्यांच्या पाठीशी आयुक्त शरद काळे यांच्या व्यतिरिक्त कोणीही उभे राहिले नव्हते. मात्र त्यानंतर गो .रा खैरनार यांना राज्य सरकारच्या आदेशाने निलंबित करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या कागदपत्रांवर तत्कालीन आयुक्त शरद काळे यांना नाईलाजाने सही करावी, लागली होती. त्यांनी नगरविकास खात्यात सचिव पदावर व अन्य काही खात्यातही काम केले.

- Advertisement -

शरद पवार यांचे ट्वीट

 शरद काळे यांच्या निधनाने मी एका अतिशय प्रामाणिक, परिपक्व सहकाऱ्याला मुकलो आहे. त्यांच्या कुटुंबियांना या संकटातून सावरण्याचे बळ मिळो आणि  काळे यांच्या आत्म्यास चिरशांती मिळो हीच प्रार्थना, असे ट्वीट करत शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -