घरताज्या घडामोडीपाणी समस्येसाठी पहाटेच माजी नगरसेवक वस्तीत!

पाणी समस्येसाठी पहाटेच माजी नगरसेवक वस्तीत!

Subscribe

नव्याने टाकण्यात आलेल्या जलवाहिनीच्या कामाचा आढावा घेवून पाणी पुरवठ्याच्या दाबाची नोंदणी प्रत्यक्ष करून घेतली.

लॉकडाऊनच्या काळातही विभागातत अन्नदानासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप तसेच फवारणी, झाडांच्या फांद्यांची छाटणी, सॅनिटायझेशनच्या कामांमध्ये सक्रीय असलेल्या माझगावमधील नगरसेविका सोनम जामसूतक आणि माजी नगरसेवक मनोज जामतसूतकर यांनी विभागातील इंदिरा नगरमध्ये होत असलेल्या कमी दाबाच्या पाणी पुरवठ्याची माहिती पहाटे प्रत्यक्ष जावून घेतली. एवढ्या पहाटे माजी नगरसेवक वस्तीत आल्याने लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. परंतु याठिकाणी नव्याने टाकण्यात आलेल्या जलवाहिनीच्या कामाचा आढावा घेवून पाणी पुरवठ्याच्या दाबाची नोंदणी प्रत्यक्ष करून घेतली.

माझगाव येथील १२०० मिमी च्या मोठया व्यासाच्या आकाराच्या मुख्य जलवाहिनीतून १५० मिमीची जलवाहिनी जोडून ती संजय गांधीनगरला पाणी पुरवठा करणाऱ्या १५० मिमीच्या जलवाहिनीला अतिरिक्तपणे जादा दाबाचा पाणीपुरवठा होणार आहे. या पाणी पुरवठ्यात सुधारणा होत असलेल्या व प्रगतीपथावर असलेल्या या कामाची माजी नगरसेवक  मनोज जामसुतकर यांनी गुरुवारी  स्वतः पहाटे पावणे पाच वाजता जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी संजय गांधीनगर येथील रहिवाश्यांना होणाऱ्या पाणीपुरवठया बाबत व पाण्याच्या प्रेशर बद्दल माहिती घेतली. यावेळी, मनोज जामसुतकर यांच्यासोबत महानगरपालिकेचे अधिकारी, अभियंते व कर्मचारी तसेच वसाहतीतील नागरिक उपस्थित होते.

- Advertisement -

शिवसेना उपनेते,स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव व स्थानिक आमदार यामिनी जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार, प्रभाग क्रमांक २१० च्या स्थानिक नगरसेविका सोनम जामसुतकर यांच्या विशेष व अथक प्रयत्नातून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु असून सध्याची तेथील पाणी पुरवठ्याची तसेच पाण्याच्या दाबाची माहिती प्रत्यक्ष अधिकाऱ्यांसमवेत जावून नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे नव्याने टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीमुळे भविष्यात किती पाणी पुरवठा वाढला आणि किती दाबाने पाणी पुरवठा होत आहे याची माहिती प्रत्यक्ष जावून घेतली. जेणेकरून भविष्यात अतिरिक्त जलवाहिनीतून पाणी पुरवठा झाल्यास त्यांचा नागरिकांना याचा किती लाभ झालेला असेल,हे त्यावेळी जाणून घेणे सोपे जाईल. यामुळे सध्या होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या आणि दाबाचीही माहिती जाणून घेतली असल्याचे जामसूतकर यांनी सांगितले. यामुळे इंदिरा नगर येथील पाण्याची मोठी समस्या दूर झालेली दिसेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


हे ही वाचा – सुशांतच्या आत्महत्येनंतर कुटुंबियांनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -