माजी क्रिकेटपटू आणि पंचांच्या पेन्शनमध्ये होणार वाढ, जय शाहांची ट्विटवरद्वारे माहिती

Former cricketers and umpires' pensions to increase

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने माजी भारतीय क्रेकेटपटू आणि सामना पंचाच्या पेन्शनबाबत एक निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. या बीसीसीआयच्या निर्णयामुळे 900 क्रिकेटपटूंचा फायदा होणार आहे.

जय शाह यांनी या ट्विटमध्ये माजी क्रिकेटपटू आणि सामना पंच यांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्यात आल्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे. तब्बल 900 क्रिकेटपटू आणि पंचाना या निर्णयाचा फायदा होणार आहे. त्यामुळे 75 टक्के खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या पेन्शनमध्ये 100 वाढ होईल, असे म्हटले आहे.

पेन्शनचे चार स्लॅब –

बीसीसीआयने पेन्शनसाठी चार स्लॅब बनवले आहेत. यापूर्वी ज्यंना 15 हजार रुपये पेन्शन मिळायची, त्यांच्या पेन्शनमध्ये 15 हजारांची वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच त्यांना आता 30 हजार पेन्शन मिळणार आहे. ज्यांना 22 हजार 500 रुपये मिळायचे, त्यांना आता 45 हजार मिळणार आहे. 30 हजार पेन्शन असणाऱ्यांना आता 52 हजार 500 रुपये मिळनार आहेत. 37 हजार 500 रुपये मिळणाऱ्यांना 60,000 रुपये देण्यात येणार आहेत. 50 हजार पेन्शन मिळणाऱ्या असलेल्या खेळाडू आणि पंचांना 70 हजार रुपये मिळतील.1 जून 2022 पासून नवी पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे.