घरताज्या घडामोडीसुधीर मुनगंटीवारांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार बंगल्याविना

सुधीर मुनगंटीवारांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार बंगल्याविना

Subscribe

माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मलबार हिल परिसरातील 'देवगिरी' हा बंगला मंत्रिपद गेल्यानंतरही रिकामा न केल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शासकीय बंगल्याविना मुंबईत वास्तव्य करण्याची पाळी आली आहे.

राज्यात आता नव्या सरकारने आपले कामकाज सुरु केले असले तरी अद्याप काही मंत्र्यांचा बंगल्यांचा तिढा कायम असल्याचे समोर आले आहे. कारण महायुतीच्या काळातील काही मंत्र्यांनी अद्याप आपला बंगला रिकामी केला नसल्याची बाब समोर आली आहे. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मलबार हिल परिसरातील ‘देवगिरी’ हा बंगला मंत्रिपद गेल्यानंतरही रिकामा न केल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शासकीय बंगल्याविना मुंबईत वास्तव्य करण्याची पाळी आली आहे.

मुनगंटीवारांनी बंगला रिकामी केला नाही

शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीन पक्षाच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्याकडे आहे. तसेच विद्यमान सरकारकडे वित्त आणि नियोजन हे महत्त्वाचे विभाग आहेत. तथापि, नवीन सरकार विराजमान होऊन जवळपास दीड महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटल्यानंतरही मुनगंटीवार यांनी ‘देवगिरी’ बंगला अद्याप रिकामा केलेला नाही. त्यामुळे मंत्रालयातील विविध शासकीय कामांसाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि अभ्यांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी मुंबईत येत असतात. त्यामुळे अजित पवार सध्या चर्चगेटच्या एका इमारतीतील सदनिकेत वास्तव्याला आहेत. पण, त्यांना भेटीस येणाऱ्यांची संख्या पाहता हे निवासस्थान कमी पडत आहे. त्यामुळे ‘देवगिरी’ बंगला कधी ताब्यात मिळतो, याकडे अजित पवार समर्थकांचे लक्ष लागलेले आहे.

- Advertisement -

घरगुती कारणासाठी मुदत वाढ मिळावी

‘देवगिरी’ बंगल्यातील वास्तव्याला घरगुती कारणासाठी मुदतवाढ मिळावी, अशी रितसर मागणी मी सरकारकडे केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हरकत नाही, असे तोंडी सांगितले होते. पण, नव्या मंत्र्यांना घाई झाली आहे. येत्या १० फ्रेबुवारीपर्यंत मी तो बंगला रिकामा करेन. – सुधीर मुनगंटीवार, माजी अर्थमंत्री


हेही वाचा – गिरणी कामगारांना ठाकरे सरकारकडून मोफत घरांची प्रतीक्षा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -