माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना शस्त्रकियेसाठी कोर्टाने दिली परवानगी, पण…

Former Home Minister Anil Deshmukh granted permission for surgery
Former Home Minister Anil Deshmukh granted permission for surgery

माजी गृहमंत्री अनिल देशमुखयाच्यावरील जे जे रुग्णालयात शस्त्रक्रियेला कोर्टाने परवानगी दिली आहे. ईडीने सादर केलेला देशमुखांचा वैद्यकीय अहवाल निर्णायक ठरला. खासगी रुग्णालयात उपचाराची गरज नाही. जे.जे रुग्णालयात उपचार होऊ शकतात, असे ईडीने म्हटले आहे.

मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वैद्यकीय अर्जावर आज न्यायालयाने निर्णय दिला आहे. अनिल देशमुख यांना खांदेदुखीचा त्रास आहे. त्यामुळे त्यांनी खांद्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याची परवानगी द्या, अशी मागणी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली होती. मात्र, ईडीने याला विरोध केला होता. यावेळी ईडीने अनिल देशमुखांवर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज नसल्याचे सांगणारा अहवाल कोर्टात सादर केला होता.

याअहवालात खासगी ऐवजी जे.जे. रुग्णालयात ही शस्त्रक्रिया होऊ शकते, असाही ईडीने दावा केला होता. अनिल देशमुख मात्र, खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यावर ठाम होते. पण कोर्टाने त्यांना झटका दिला असून आता त्यांना जे.जे रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे.