१०० कोटी वसुली प्रकरण: ‘नॉट रिचेबल’ माजी गृहमंत्री अनिल देशमुख ED कार्यालयात दाखल

former home minister reached ed office in 100 crore money laundering case to record his statement

गेल्या अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर ईडी कार्यालयात आपला जबाब नोंदवण्यासाठी हजर झाले आहेत. अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुली प्रकरणात आरोप झाले आहेत. आज सकाळी अनिल देशमुख ईडी कार्यालयाचत पोहचले आहेत. ईडीकडून त्यांची कसून चौकशी केली जाणरा आहे. त्यांच्यासोबत इंद्रपाल सिंहदेखील ईडी कार्यालयात दाखल झाले.आजच्या ईडी जबाबानंतर त्यांची फक्त चौकशी होणार की की त्यांना अटक केली जाणार ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ईडीने पाचवेळा समन्स बजावूनही ईडी कार्यालयाच्या कोणत्यात नोटीशीला अनिल देशमुख यांनी उत्तर दिले नव्हते. गेल्या अनेक दिवसांपासून तपास यंत्रणांना अनिल देशमुख हवे होते. पण ते अज्ञातवासात असल्याने त्यांचे ठिकाण शोधण्यात तपास यंत्रणांना अपयश आले होते. अखेर ते आज चौकशीला हजर झाले आहेत. देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी १०० कोटी रूपयांच्या खंडणी वसुलीचे आरोप केले होते. सध्या परमबीर सिंहही तपास यंत्रणांना हवे आहेत. त्यांच्यावरही खंडणी प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.


याआधी ईडीने अनेकदा समन्स बजावूनही अनिल देशमुख एकदाही ईडीच्या चौकशीला हजरे झाले नव्हते. ईडीने या प्रकरणातून अनिल देशमुख यांना कोणताही सवलत दिली नव्हती. अनिल देशमुखांविरोधात सीबीआय आणि ईडी अशी दोन प्रकरणं आहेत. यातील ईडीच्या प्रकरणात अनिल देशमुखांना हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाने कोणताही दिलासा दिला नाही. त्यामुळे अनिल देशमुख इतक्या महिन्यांनंतर ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. यापुढी ईडीची काय कारवाई असणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

अनिल देशमुखांचे ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी स्पष्टीकरण 

ईडी कार्यालयात पोहचताच अनिल देशमुखांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात अनिल देशमुखांनी म्हटले की, “मला जेव्हा ईडीचा समन्स आला तेव्हा मी ईडीला सहकार्य करत नाही अशा चुकीच्या बातम्या वर्तमानपत्र आणि प्रसार माध्यमांमध्ये आल्या. पण ज्या- ज्या वेळेस मला ईडीचा समन्स आला त्यावेळी मी त्यांना कळविले की, माझी याचिका हायकोर्टात असून त्यावर सुनावणी सुरु आहे. सुप्रीम कोर्टातही मी याचिका दाखल केली, त्याचा निकाल आल्यानंतर मी स्वत: ईडी कार्यालयात येईन. ईडीने जेव्हा आमच्या सर्व घरावर छापे टाकले तेव्हा मी माझ्या परिवाराने, माझ्या सहकार्यांनी, सर्व कर्मचाऱ्यांनी, सर्वांनी त्यांना सहकार्य केले. सीबीआयचा मला दोन वेळा समन्स आला, त्या दोन्ही समन्सला मी सीबीआय कार्यालयात माझा जबाब नोंदवला. अजूनही माझी केस सुप्रीम कोर्टात आहे तरीही मी आज स्वत: ईडीच्या कार्यालयात हजर झालो आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माझ्यावर खोटे आरोप केले, ज्या परमबीर सिंहांनी माझ्यावर खोटे आरोप केलेत. ते परमबीर सिंह कुठे आहेत? अनेक बातम्या वर्तमानपत्रांमध्ये येत आहेत. या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये येत आहेत त्यानुसार परमबीर सिंह भारत सोडून परदेशात पळून गेलेत. म्हणजे ज्या परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांविरोधात आरोप केले तो आरोप करणारा पळून गेला. आज परमबीर सिंहविरोधात त्याच्याच पोलीस खात्यातील अधिकारी, व्यावसायिक आरोप करतायत. त्यांनी अनेक पोलीस स्थानकात जाऊन तक्रारी दाखल केल्य़ा आहेत.”