Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई अनिल देशमुखांनी ठोठावला मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा, CBI मार्फतची FIR रद्द करण्याची...

अनिल देशमुखांनी ठोठावला मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा, CBI मार्फतची FIR रद्द करण्याची मागणी

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात दरवाजा ठोठावला असून त्यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे. कोणत्याही जबरदस्तीने केलेल्या कारवाईला संरक्षण देण्याच्या आदेशाची मागणीही देशमुख यांनी केली आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस सीबीआय मार्फत एफआयआर नोंदवल्यानंतर नागपूर येथील देशमुख यांच्या घरासह अनेक ठिकाणी छापा टाकण्यात आला होता. सीबीआयने देशमुख यांच्याविरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या कलम १२० ब अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांनी वसुली रॅकेट चालवल्याचा आरोपही केला होता, यासंदर्भातील प्रकरणात हा गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

असे आहे प्रकरण

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपाखाली अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. परमबीर सिंग यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप केला होता. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात परमबीर सिंह यांनी असा आरोप केला आहे की, अनिल देशमुख सचिन वाझे यांना त्यांच्या घरी भेटत असत. तसेच, दरमहा मुंबईतून १०० कोटी रुपये वसूल करण्याचेही त्याने सांगितले होते.

- Advertisement -

या प्रकरणी ठाकरे सरकारने कोणतीही कारवाई केली नाही, तेव्हा परमबीर सिंग यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर हायकोर्टाने सीबीआयला परमबीर यांच्या आरोपांची चौकशी करण्यास सांगितले होते. न्यायालयाने असे म्हटले की, सीबीआय पुढील १५ दिवस अहवाल देईल त्यानंतर अनिल देशमुख यांच्याविरूद्ध एफआयआर नोंदवायचा की नाही याचा निर्णय स्पष्ट करेल. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर देशमुख यांनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाशी संवाद साधला होता, परंतु सर्वोच्च न्ययालयाने त्यांची याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला. प्राथमिक चौकशी आणि देशमुख यांचा जबाब घेतल्यानंतर सीबीआयने एप्रिलच्या अखेरीस देशमुख यांच्याविरूद्ध एफआयआर नोंदविला होता.

 

- Advertisement -