Parambir Singh : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह अखेर मुंबईत दाखल

mumbai former police commissioner parambir singh extortion case chandiwal committee asks for the appearance before them
Extortion Case : परमबीर सिंह हजर व्हा, अन्यथा... चांदीवाल समितीने दिले मोठे संकेत

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह गेल्या अनेक दिवसांपासून गायब होतो, मात्र परमबीर सिंह आज मुंबईत दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. कोर्टाने त्यांना फरार म्हणून घोषित केले होते. अशातच चंढिगडहून ते आज मुंबईत दाखल झाले आहेत. परमबीर सिंह आत्ता गृहरक्षक दलाच्या कार्यालयात जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यानंतर किल्ला न्यायालयात हजर होऊ शकतात. अशातच परमबीर सिंह गोरेगाव खंडणी प्रकरणात गुन्हे शाखा कक्ष ११ च्या गोरेगाव येथील कार्यालयात हजर झाले आहेत.

गोरेगाव खंडणी प्रकरणात परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्यात आले होते. याप्रकरणात अनेकदा समन्स काढले होते. मात्र त्यानंतरही ते पोलिसांसमोर हजर झाले नाही. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणात परमबीर सिंह यांच्यासह रियाझ भाटी आणि विनय सिंह यांनी फरार घोषित केले. फौजदारी गुन्हे दाखल असल्याने अटकेल्या भीतीने परमबीर सिंह बेपत्ता झाले होते. अशातच सुप्रीम कोर्टाने सोमवारी अटकेपासून संरक्षण दिले, तसेच त्यांच्या याचिकेवर बाजू मांडण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकार, पोलीस महासंचालक आणि केंद्रीय अन्वेषण विभाग)सीबीआय यांना दिले आहे. यानंतर आज परमबीर सिंह मुंबईत झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, आपण तपासाला सहकार्य करु आणि आपल्याला जे सांगायचंय ते आपण कोर्टात सांगू असं परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे.

या गोरेगाव खंडणी प्रकरणी राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली. या समितीने केलेल्या चौकशीत अनेक पुरावे आढळून आले होते. त्यानंतर पोलीस निरीक्षक आशा कोरके आणि नंदकुमार गोपाळे यांना अटक करण्यात आली आहे.
या दोघांनी गुन्हा दाखल न करून घेण्यासाठी ५० लाख रुपये घेतले होते. अशी माहिती समोर आली आहे. या दोघांनी तक्रारदाराकडून खंडणी घेण्यासाठी हवालाचा वापर केला होता. यात परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरुन आपण पैसे घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हवाला ॲापरेटर मोमिन याच्या माध्यमातून हे व्यवहार झाल्याचे म्हटले जाते.

दरम्यान फरार परमबीर सिंह यांच्यावर मुंबईत तसेच ठाण्यात गुन्हे दाखल झाल्यानंतर अनेकांनी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त संपर्कात येत नव्हते. परमबीर सिंह हे देश सोडून गेल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या, मात्र ठाम पणे कोणीही सांगू शकत नव्हते की परमबीर सिंह आहे तरी कुठे ? पण आज बुधवारी दुपारी अचानक परमबीर सिंह यांच्या मोबाईल फोन सुरू झाला व ते व्हाट्सएप आणि टेलिग्राम वर ऍक्टिव्ह असल्याचे दिसले. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार आणि सीबीआयला येत्या ६ डिसेंबरपर्यंत परमबीर सिंह यांना अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान परमबीर सिंह हे चंढिगडमध्ये असल्याचे वृत्त एबीपी माझा वृत्तवाहिनीने दिले आहे.

परमबीर सिंह यांचा मोबाईल अनेक महिन्यानंतर अॅक्टिव्ह

परमबीर सिंह अॅक्टिव्ह असल्याचे बघून अनेकांनी त्यांना मेसेज केले. मात्र त्यांनी कुणालाही उत्तर दिले नाही किंवा कुणाचा फोन देखील ते उचलत नव्हते. मुंबई गुन्हे शाखेकडे असलेल्या गोरेगाव येथील खंडणीच्या गुन्हयात परमबीर सिंह यांना न्यायालयाने फरार घोषित केले तसेच त्यांना ३० दिवसांचा वेळ दिला आहे. या ३० दिवसात सिंह हजर झाले नाही तर त्यांच्या संपत्तीवर टाच येऊ शकते असे ही न्यायालयाने आदेशात म्हटले होते. त्यानंतर अचानक बुधवारी परमबीर सिंहहे सोशल मीडिया आणि मोबाईलवर रीचेबल झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.

परमबीर सिंह किल्ला न्यायालयाच्या आदेशाला घाबरून शरण येण्याची शक्यता वर्तवली जात असून अशी चर्चा देखील सुरू आहे. सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर परमबीर सिंह यांचा फोन ऍक्टिव्ह झाला आहे. सुप्रीम कोर्टाने परमबीर यांच्यावर तूर्तास कठोर कारवाई न करण्याचे आदेश दिलेत. परमबीर सिंह यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात माहिती दिली होती की जर कोर्टाने आदेश दिले तर ४८ तासात सीबीआयकडे शरण जायला तयार आहे.

परमबीर सिंह यांच्यावर काय आरोप आहेत?

गोरेगाव येथील हॉटेल बोहो अ‍ॅण्ड रेस्टॉरंट हे विनादिक्कत सुरू रहावे, त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करू नये, म्हणून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचा तत्कालीन पोलीस अधिकारी सचिन वाझे याने तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरून लाखो रुपयांची खंडणी उखळली, अशी तक्रार हॉटेल मालक बिमल अग्रवाल यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात केली होती. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह, सचिन वाझे, खासगी इसम अल्पेश पटेल, रियाज भाटी, विनय सिंह उर्फ बबलू, सुमित सिंह उर्फ चिंटूसह ६ जणांविरुद्ध खंडणी, धमकी देणे, कट रचणे, पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखा कक्ष ११ कडे तपासासाठी सोपवण्यात आला आहे.  या प्रकरणात किल्ला न्यायालयाने परमबीर सिंग , रियाज भाटी आणि विनय सिंह यांना फरार घोषित केले होते, तसेच ३० दिवसात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.