Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई मुंबईत सेनेला मोठा धक्का; माजी आमदार तृप्ती सावंत यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबईत सेनेला मोठा धक्का; माजी आमदार तृप्ती सावंत यांचा भाजपमध्ये प्रवेश

Related Story

- Advertisement -

मुंबईत शिवसेना मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विरोधी पक्षनेते भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर, नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. तृप्ती सावंत या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेनेचं प्रतिनिधीत्व केलं होतं.

शिवसेनेने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तृप्ती सावंत यांचं तिकीट कापून, शिवसेनेचे तत्कालिन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली होती. उमेदवारी न दिल्यामुळे तृप्ती सावंत यांनी त्यावेळी बंडखोरी केली होती. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव झाला होता. त्याठिकाणी काँग्रेसचा तरुण उमेदवार झिशान सिद्दीकी हे विजयी झाले.

कोण आहेत तृप्ती सावंत?

- Advertisement -

तृप्ती सावंत या शिवसेनेचे दिवंगत आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी आहेत. २००५ मध्ये बाळा सावंत यांचं निधन झालं. त्यामुळे पोटनिवडणूक जाहीर झाली होती. बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना तिकीट दिलं होतं. त्या पोटनिवडणुकीत तृप्ती सावंत यांनी नारायण राणे यांचा पराभव केला. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीला शिवसेनेने तृप्ती सावंत यांना डावलून विश्वनाथ महाडेश्वरांना उमेदवारी दिली. पक्षाने डावलल्याने तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणुक लढवली. याचा फटका शिवसेनेला बसला. शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव झाला.

 

- Advertisement -

 

 

- Advertisement -