घरमुंबईमाजी राज्यपाल राम नाईक यांच्या पत्नी कुंदा नाईक पंचतत्वात विलीन

माजी राज्यपाल राम नाईक यांच्या पत्नी कुंदा नाईक पंचतत्वात विलीन

Subscribe

उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्या पत्नी श्रीमती कुंदा नाईक यांचे मंगळवारी सायंकाळी मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले.

Kunda Naik Passes Away : उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्या पत्नी श्रीमती कुंदा नाईक यांचे मंगळवारी सायंकाळी मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले. रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर गोरेगाव येथील शिवधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्यानं सगळीकडे शोककळा पसरली आहे.

वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. माजी महिला राज्यपाल कुंदा नाईक यांनी आयुष्यभर घरातील आर्थिक आणि व्यावहारिक धुरा सांभाळली. महापालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणूनही त्यांनी काम केलं. याच कारणामुळे राम नाईक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि भारतीय जनता पक्षात पूर्णवेळ काम करू शकले.

- Advertisement -

नाईक कुटुंबात त्यांच्या पश्चात पती राम नाईक, मुलगी निशिगंधा नाईक, विशाखा कुलकर्णी आणि नातू अॅड. शार्दुल कुलकर्णी यांचा समावेश आहे. २०१३ मध्ये राम नाईक यांनी खुल्या मंचावरून आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. आगामी निवडणूक २०१४ च्या लोकसभा निवडणूक भाजपला प्रचंड जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर राम नाईक यांना उत्तर प्रदेशचे राज्यपाल बनवण्यात आले. ते २०१९ पर्यंत या पदावर होते. यानंतर राम नाईक सक्रिय राजकारणापासून दूर झाले. मात्र, त्यांनी राजकारणात पुनरागमन करण्याची घोषणा केली. तेव्हा ते म्हणाले होते की अजून २५ वर्षे बाकी आहेत. माणसाने १०० वर्षे सक्रिय राहण्याचा प्रयत्न करायला हवा. मी ८५ वर्षे पूर्ण केली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -