घरमुंबईमुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, 29 वर्षांपासून होते वॉन्टेड

मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, 29 वर्षांपासून होते वॉन्टेड

Subscribe

1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील चार आरोपींनी गेल्या 29 वर्षांपासून वॉन्टेड होते. त्यांना गजरा एटीएस आणि सिबीआयच्या पथकाने गेल्या आठवड्यात अहमदाबादमधून पकडले होते. यानंतर आज त्यांनी न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने चार आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. सुनावणी संपल्यानंतर सीबीआयने या आरोपींना ताब्यात घेतले. मुंबईत 1993 मध्ये 12 ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटातील आरोपी 4 वर्षांवासून वॉन्टेड होते.

अहमदाबादमधून घेतले ताब्यात –

- Advertisement -

२९ वर्षांपासून गुजरात एटीएस आणि सीबीआयचे पथक मुंबईतील बॉम्बस्फोटातील चार आरोपींचा शोध घेत होते. गुजरात एटीएसने या चार आरोपींना गेल्या आठवड्यात अहमदाबादमधून पकडले. सोमवारी या आरोपींची न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. हे प्रकरण गुजरात एटीएसने सीबीआयकडे वर्ग केले आहे.

रेड कॉर्नर नोटीस –

- Advertisement -

गेल्या आठवड्यात गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) या चौघांना अटक केली. या चार आरोपींच्या शोधात केवळ मुंबई पोलीस, सीबीआय किंवा गुजरात एटीएसच नाही तर जगातील अनेक सुरक्षा यंत्रणा घेत होत्या. या चारही आरोपींविरुद्ध इंटरपोल आणि रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती.

१०० आरोपींना दोषी ठरवले दोषी –

१९९३ मुंबई बॉम्बस्फोटात २५७ लोकांचा मृत्यू झाला होता. स्फोटांमध्ये ७०० पेक्षाजास्त लोक लोक जखमी झाले होते.बॉम्बस्फोटातील आरोपींपैकी १८९ जणांविरुद्ध आरोपपत्र सादर करण्यात आले आहे.२००६ मध्ये मुंबई न्यायालयाने यातील १०० आरोपींना दोषी ठरवले होते.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -