Homeक्राइमDrugs Smuggling : ड्रग्ज तस्करीप्रकरणी परदेशी नागरिकासह चौघांना अटक; 1.65 कोटींचा ड्रग्ज...

Drugs Smuggling : ड्रग्ज तस्करीप्रकरणी परदेशी नागरिकासह चौघांना अटक; 1.65 कोटींचा ड्रग्ज साठा जप्त

Subscribe

ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत परदेशी नागरिकासह चौघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर आणि वरळी युनिटच्या अधिकार्‍यांनी अटक केली.

मुंबई : ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत परदेशी नागरिकासह चौघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर आणि वरळी युनिटच्या अधिकार्‍यांनी अटक केली. नयुम शेख, संजीब सरकार, मोहम्मद बाष्टिस्टा आणि फेथ इग्नीबोसा अशी या चौघांची नावे आहेत. यातील मोहम्मद आणि फेथ हे नायजेरीयन नागरिक असून अटकेनंतर चौघांनाही किल्ला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. (four arrested including foreign nationals in drug smuggling case; drug stock worth 1.65 crore seized in the operation)

नवीन वर्षाच्या पार्टीसाठी काहीजण ड्रग्ज तस्करीच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर घाटकोपर युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ढोले आणि त्यांच्या पथकाने कुर्ला येथून संजीब सरकार या 40 वर्षीय आरोपीस अटक केली. संजीब हा कोकेनच्या डिलिव्हरीसाठी तिथे आला होता, मात्र त्यापूर्वीच त्याला पोलिसांनी 1 कोटी 18 लाखांच्या 396 ग्रॅम वजनाच्या कोकेनसह शिताफीने अटक केली.

हेही वाचा – Dharashiv Crime : धाराशिवच्या सरपंचाने स्वत:च रचला हल्ल्याचा बनाव; जाणून घ्या कारण…

दुसर्‍या कारवाईत या युनिटने गोवंडीतील देवनार परिसरातून नयुम शेख या 28 वर्षांच्या तरुणाला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 900 कोडेनमिश्रित बॉटल्सचा साठा जप्त केला असून त्याची किंमत सुमारे साडेचार लाख रुपये इतकी आहे. ही कारवाई सुरू असताना वरळी युनिटने आग्रीपाडा येथून दोन नायजेरियन नागरिक मोहम्मद आणि फेथ या दोघांना अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी 170 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले असून त्याची किंमत 42 लाख 50 हजार इतकी आहे.

या तिन्ही कारवाईत पोलिसांनी 396 ग्रॅम वजनाचे कोकेन, 170 ग्रॅम वजनाचे एमडी आणि 900 कोडेनमिश्रीत बॉटल्स असा 1 कोटी 65 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. 2024 मध्ये मुंबई पोलिसांच्या ऍण्टी नारकोटीक्स सेलने ड्रग्जसंबंधित 93 गुन्हे दाखल करून घेतले. या गुन्ह्यांत 184 ड्रग्ज तस्करांना अटक केली असून त्यांच्याकडून 3492 किलो 876 ग्रॅम वजनाचा ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. या ड्रग्जची किंमत 60 कोटी 63 लाख रुपये इतकी आहे.

हेही वाचा – US Firing : नववर्ष स्वागतादरम्यान अमेरिकेत गोळीबार; 24 तासातील तिसरा मोठा हल्ला


Edited by : Ashwini A. Bhatavdekar