घरताज्या घडामोडीDahi Handi 2021: दहीहंडी साजरी केल्यामुळे मुंबईत चार गुन्हे दाखल

Dahi Handi 2021: दहीहंडी साजरी केल्यामुळे मुंबईत चार गुन्हे दाखल

Subscribe

गेल्या वर्षीप्रमाणे याहीवर्षी कोरोना प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सव साजरी करण्यास राज्य सरकारकडून परवानगी नाकारण्यात आली. पण राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात भाजप आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेतला. मनसे आणि भाजपच्या नेतृत्वात मुंबईतील अनेक ठिकाणी दहीहंडी साजरी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. मुंबईत आतापर्यंत दहीहंडी साजरी केल्यामुळे चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबईतील कस्तुरबा, घाटकोपर, वरळी आणि काळचौकी पोलीस ठाण्यात दहीहंडी साजरी केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारने दहीहंडी साजरी करण्यास परवानगी नाकारली होती. पण याविरोधात भाजप आणि मनसेनेसह दहीहंडी मंडळांनी जोरदार आवाज उठवला. आम्ही दहीहंडी साजरी करू, अशी ठाम भूमिका मनसेने घेतली. त्यामुळे मुंबईतील ठिकठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.

मनसे नेते बाळा नांदगावकर दहीहंडी फोडण्यासाठी आणि उत्सव साजरा करण्यासाठी मुंबई काळाचौकी परिसरातल्या मैदानात दाखल झाले. यावेळी जमलेली गर्दी बघता पोलिसांनी त्यांना अडवले. आम्ही आमचे सण साजरे करणारच; प्रतिकात्मक दहीहंडी फोडू द्या, अशी मागणी देखील नांदगावकर यांनी केली. मात्र ती नाकारत पोलिसांनी मनसे नेते बाळा नांदगावकर यांना ताब्यात घेतले. तसेच घाटकोपर भटवाडीमध्ये मनसेने सरकारच्या निषेधाची हंडी फोडली. यावेळी मनसेने पाच थर लावून हंडी फोडून सरकारचा निषेध केला. शिवाय सरकारची दडपशाही चालणार नाही असे म्हणत वरळी नाका इथे मनसेच्या गोविंदा पथकाने दहीहंडी फोडली. अशा प्रकारे सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबईत ठिकठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.

- Advertisement -

हेही वाचा – हे काही स्वातंत्र्य युद्ध नाही, कोरोना नियम मोडून दहीहंडी साजरी करणाऱ्या मनसेवर मुख्यमंत्र्याचा निशाणा


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -