घरताज्या घडामोडीमुंबईच्या काळबादेवी परिसरात इमारतीचा भाग कोसळला

मुंबईच्या काळबादेवी परिसरात इमारतीचा भाग कोसळला

Subscribe

चार मजली इमारतीचा भाग कोसळल्याची धक्कादायक घटना दक्षिण मुंबईच्या काळबादेवी परिसरात घडली आहे. गुरूवारी दुपारी ०२:०७ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ही म्हाडाची जूनी इमारत होती.

चार मजली इमारतीचा भाग कोसळल्याची धक्कादायक घटना दक्षिण मुंबईच्या काळबादेवी परिसरात घडली आहे. गुरूवारी दुपारी ०२:०७ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ही म्हाडाची जूनी इमारत होती. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. तसेच, शर्तीच्या प्रयत्नांनी बचावकार्य करत आहेत. (four floor building collapse in kalbadevi area)

काळबादेवीतील बदाम वाडी येथील इमारत क्रमांक ३३९/३४१ या चार मजली म्हाडाच्या जून्या इमारतीचा भाग कोसळला. तळमजला आणि चार मजले असणार ही इमारत कोसळली. या इमारतीचे बांधकाम सुरू होते. मात्र त्याचवेळी या इमारतीचा भाग कोसळला. या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप अस्पष्ट आहे. मात्र परिसरात मातीचा मोठ्या प्रमाणात ढिगारा जमा झाला आहे. सध्या ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे.

- Advertisement -

मुंबईत कालपासून पावसाने जोर धरला आहे. त्यानंतर आता इमारत कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. मुंबईच्या कुर्ला परिसरात काल नुकतीच इमारतीचा एक भाग कोसळल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर आता काळबादेवी परिसरात चार मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेमध्ये किती नागरीक जखमी झाले आहेत याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. अग्निशमन दल आणि प्रशासनाचे इतर अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून ढिगारा उचलण्याचं काम सुरु झालं आहे.


हेही वाचा – कोण आहेत? महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; जाणून घ्या एका क्लिकवर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -