घरमुंबईOrgan Donation : मुंबईत दोन दिवसात चार अवयवदान!

Organ Donation : मुंबईत दोन दिवसात चार अवयवदान!

Subscribe

कोरोनाला न घाबरता पुढाकार घेतलेल्या कुटुंबियांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मुंबईत सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे अवयवांची गरज असणार्‍यांची यादी वाढत असताना अवयवदात्यांची संख्या मात्र घटली आहे. परंतु, ३ आणि ४ मार्च या दोन दिवसांत मुंबईत चार अवयवदान करण्यात आले असून त्यामुळे गरजूंना मदत होणार आहे. यात चार किडनी आणि तीन यकृते गरजूंना देण्यात आले. त्यातील दोन किडन्या, एक यकृत आणि एक हृदय हे प्रत्यारोपणासाठी योग्य आढळले नाही. मंगळवार मध्यरात्री अवयव दानाची सुरूवात झाली. त्यानंतर बुधवार ३ मार्चला सकाळी ८ वाजून २४ मिनिटांनी, तसेच मध्यरात्री १ वाजून ०१ मिनिटांनी आणि त्यानंतर गुरुवार ४ मार्चला सकाळी ८ वाजून ५६ मिनिटांनीही असे एकूण चार अवयवदान दोन दिवसात झाले. त्यामुळे कोरोना काळातही न घाबरता पुढाकार घेतलेल्या कुटुंबियांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

जनजागृतीला बळकटी मिळाली

एका ७९ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाच्या यकृतामुळे एका नागरिकाला जीवदान मिळाले. तर अन्य दात्यांचे अवयव माहीममधील एस. एल. रहेजा फोर्टिस हॉस्पिटल, नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल, लीलावती हॉस्पिटल आणि मुलुंडचे फोर्टिस हॉस्पिटल येथे दान झाले. या चार अवयवदानांमुळे जनजागृतीला बळकटी मिळाली आहे. तसेच शहरातील अवयवदान वाढवण्यासाठीच्या यशात झेडटीसीसीचा मोठा वाटा आहे. झेडटीसीसी समन्वयक उर्मिला महाजन यांना अल्पावधीत चार अवयवदानाच्या घटना हाताळणे अवघड होते. मात्र, रुग्णालये आणि दात्यांच्या कुटुंबामुळे हे शक्य झाले, असे त्या म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -