घरमुंबईम्हाडाच्या फ्लॅटच्या नावाने फसवणूक; लोअर परेल येथील घटना

म्हाडाच्या फ्लॅटच्या नावाने फसवणूक; लोअर परेल येथील घटना

Subscribe

लोअर परेल येथील म्हाडाच्या दोन फ्लॅटसाठी सुमारे ३१ लाख रुपये घेऊन वयोवृद्ध निवृत्त मिल कामगाराची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी राजन सहदेव लोके आणि रमाकांत गोविंद भोसले या दोघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.

लोअर परेल येथील म्हाडाच्या दोन फ्लॅटसाठी सुमारे ३१ लाख रुपये घेऊन वयोवृद्ध निवृत्त मिल कामगाराची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी राजन सहदेव लोके आणि रमाकांत गोविंद भोसले या दोघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. (Fraud in the name of Mhada’s flat Incidents at Lower Parel )

७५ वर्षांचे वयोवृद्ध वरळीतील एका मिलमधून निवृत्त झाले असून, ते सध्या त्यांच्या कुटुंबियांसोबत भोईवाडा परिसरात राहतात. त्यांच्या मालकीचे लोअर परेल येथे एक घर होते. ही जागा पुर्नविकासासाठी गेल्याने ते सध्या भाड्याच्या रुममध्ये राहतात. त्यामुळे ते नवीन घर विकत घेण्याचा विचार करत होते. याच दरम्यान, त्यांची ओळख रमाकांतशी झाली होती. तो इस्टेट एजंटचे काम करत होता. त्याने म्हाडाचा फ्लॅट देण्यासाठी त्यांना मदत करण्याचे आश्‍वासन देत त्यांची ओळख राजनसोबत करुन दिली होती. त्याने राजनची म्हाडामध्ये चांगली ओळख असून तो त्यांना म्हाडाचा फ्लॅट मिळवून देईल असे सांगितले होते.

- Advertisement -

( हेही वाचा: मुंबईत अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या आठ बांगलादेशी नागरिकांना अटक )

त्यानंतर या दोघांनी त्यांना डिलाईल रोड आणि लोअर परेल येथे काही म्हाडाचे फ्लॅट दाखवले होते. त्यातील लोअर परेल येथील दोन फ्लॅट त्यांना पसंत पडले होते. या दोन्ही फ्लॅटचा व्यवहार ६० लाख रुपयांमध्ये होईल असे सांगण्यात आले होते. त्यांच्याकडून होकार मिळताच त्यांनी त्यांच्याकडे फ्लॅटसाठी आगाऊ रक्कमेची मागणी केली होती. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्याला ३१ लाख ५० रुपयांचे पेमेंट केले होते तर उर्वरित पेमेंट फ्लॅटचा ताबा मिळाल्यानंतर देण्याचे ठरले होते. याच दोन्ही फ्लॅटसाठी त्यांना एका खाजगी पतपेढीतून कर्ज मिळवून देण्याचेही त्यांनी आश्‍वासन दिले होते. मात्र त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही. तसेच पैसे दिल्याचा पतपेढीच्या पावत्याही बोगस असल्याचे नंतर त्यांच्या लक्षात आले. राजन हा अशा प्रकारच्या गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार असून त्याने अनेकांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे चौकशीदरम्यान उघडकीस आले होते. या प्रकारानंतर त्यांनी भोईवाडा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर राजन लोके आणि रमाकांत भोसले यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. या दोघांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -